पालकांनो सावधान! चिमुकल्यांमध्ये वाढू लागलाय हृदयविकार; काय असतील कारणे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:14 AM2024-01-08T10:14:17+5:302024-01-08T10:15:05+5:30
लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता वाढताना दिसू लागला आहे.
मुंबई : सध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे फार गरजेचे झाले आहे. आरोग्याकडे थोडा जरी निष्काळजीपणा केला तर तो महागात पडू शकतो. आपण अनेकदा वृद्धांमध्ये, तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचे ऐकले आहे. पण, लहान मुलांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका आता वाढताना दिसू लागला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही मुलांना जन्मापासूनच हृदयविकाराचा धोका असतो.
जेव्हा आई गरोदर राहते, तेव्हा मुलांना जन्मजात हृदयविकाराची झळ बसते आणि त्यांना याच भीतीने आयुष्य काढावे लागते. या आजारात हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्त प्रभाव पडतो. हा हृदयविकाराचा सर्वात मोठा धोका असतो.
मुलांना हृदयविकाराचा झटका का येतो?
मुलांमध्ये हृदयविकाराचे मुख्य कारण म्हणजे वेंट्रिक्युलर फायब्रिलेशनमुळे हृदयाच्या कार्यामध्ये समस्या. यामध्ये हृदयाचे वेंट्रिकल्स वेगाने आणि अनियमित स्वरूपात धडकू लागतात. हे सहसा हृदयाशी संबंधित जन्मजात समस्यांमुळे होते.
जंक फूडचा धोका :
लठ्ठपणा हे हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण असल्याचे हृदयरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांची शारीरिक हालचाल कमी होत असताना, फास्ट-जंक फूड खाण्याच्या सवयीमुळे हा धोका खूप वाढला आहे. इतकेच नाही तर मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीमध्ये गुंतल्यानेही समस्या उद्भवत आहे.
त्वचा किंवा ओठ निळसर रंगाचे होतात.
खाण्यास त्रास होणे.
धाप लागणे.
थोडं जरी चालले तरी धाप लागणे.
योग्यरित्या मुलांची वाढ न होणे.
चक्कर येणे, सांधेदुखी आणि छातीत दुखणे.
लठ्ठपणा ठरतोय घातक :
आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. मुलांमध्ये हृदयविकारात वाढ भविष्यासाठी एक गंभीर बाब आहे. कारण वाईट जीवनशैलीमुळे केवळ प्रौढांनाच नाही तर मुलांच्या हृदयालाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
निष्काळजीपणा ठरतोय कारणीभूत?
प्रौढांप्रमाणेच मुलांना हृदयविकाराचा धोका असू शकतो. जेव्हा हृदय अचानक शरीराच्या अवयवांना आणि ऊतींना प्रभावीपणे रक्त पंप करणे थांबवते तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते, जी जीवघेणी ठरू शकते. लहान मुलांची यामुळे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. ताबडतोब मुलांना डॉक्टरांकडे नेऊन तपासण्या कराव्यात. -विश्वास सोळंखी, हृदयरोग तज्ज्ञ
मुलांमधील हृदयविकाराची लक्षणे कोणती?
या संदर्भात आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की, सुदृढ बालकेही जन्माच्या वेळी हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत.
पालकांचा निष्काळजीपणाही यामागे एक कारण असू शकते.
त्यामुळे लहान वयातच रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्राॅल यासारखे आजार मुलांमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.