या कारणाने जास्त वाढतो हृदयरोगांचा धोका, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:44 AM2022-10-27T11:44:26+5:302022-10-27T12:14:02+5:30

Heart Disease : जगभरात हृदयरोग आणि वजन वाढण्याच्या समस्येने लोक अधिक हैराण आहेत. कमी वयातही आता हृदयरोगांचा सामना लोकांना करावा लागत आहे.

Heart Disease : More danger heart diseases watching tv more hours in free time | या कारणाने जास्त वाढतो हृदयरोगांचा धोका, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

या कारणाने जास्त वाढतो हृदयरोगांचा धोका, तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

googlenewsNext

Heart Disease :  बदलत्या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या आरोग्यावर अनेक वाईट परिणाम होताना बघायला मिळत आहेत. यात जगभरात हृदयरोग आणि वजन वाढण्याच्या समस्येने लोक अधिक हैराण आहेत. कमी वयातही आता हृदयरोगांचा सामना लोकांना करावा लागत आहे.

हृदयरोगांची वेगवेगळे कारणे वेगवेगळ्या रिसर्चमधून सतत समोर येत असतात. त्यात एकाच जागेवर बसून तासंतास काम करणे हे हृदयासाठी धोकादायक असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता एका नव्या रिसर्चनुसार, एका जागी बसून जास्त वेळ काम करण्यापेक्षाही बसून टीव्ही बघणे हे अधिक घातक आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा दावा करण्यात आला आहे. हा रिसर्च अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातील अभ्यासकांनी केला आहे. या रिसर्चमध्ये त्यांना आढळलं की, रिकाम्या वेळेत बसून टीव्ही बघितल्याने हृदयासंबंधी आजार आणि त्यातून मृत्यूचा धोका वाढतो.

हा रिसर्च अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. रिसर्चचे लेखक कीथ एम डियाज म्हणाले की, 'आमच्या रिसर्चमधील निष्कर्ष हे दाखवतात की, तुम्ही कामाव्यतिरिक्त काय करता, हे हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरतं'.

डियाज यांनी सांगितले की, जर तुमची नोकरी जास्त तास बसून काम करण्याची असेल आणि तुम्ही घरी घावलेल्या वेळात व्यायाम करत असाल तर याने हृदयासंबंधी आजार आणि मृत्युचा धोका कमी होतो. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी साधारण साडे आठ वर्षापर्यंत ३, ५९२ लोकांच्या हालचालीवर लक्षात ठेवले. या रिसर्चमध्ये सहभाग घेणाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी किती तास बसून टीव्ही बघितला आणि किती तास बसून काम केलं. 

या रिसर्चमधून हेही समोर आलं की, चार किंवा त्यापेक्षा अधिक तास एक दिवसात टीव्ही बघणाऱ्या लोकांमध्ये हृदयघात किंवा मृत्यूचा धोका त्या लोकांपेक्षा होता, ज्यांनी दररोज दोन तासांपेक्षा कमी वेळ टीव्ही पाहिला.

Web Title: Heart Disease : More danger heart diseases watching tv more hours in free time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.