सावधान! चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?; जाणून घ्या, काय असू शकतो धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:34 PM2024-09-06T15:34:40+5:302024-09-06T15:49:21+5:30
चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
भारतातील बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा किंवा कॉफी पितात. काही लोकांना आळस दूर करण्यासाठी चहा पिणं आवडतं. यामुळे इंस्टंट एनर्जी येते. मात्र जास्त चहा पिणं आरोग्यासाठी चांगलं नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. झोप आणि भुकेवर परिणाम होऊ शकतो. हृदयासंबंधित आजारही होऊ शकतात. अशा परिस्थितीत चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
जास्त चहा प्यायलामुळे काय नुकसान होतं?
- ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, सॅच्युरेटेड फॅट वाढतं.
- ॲसिडिटीची समस्या.
- पिंपल्स येतात.
- झोपेचा अभाव.
- अल्सरचा त्रास.
- हाडांचं नुकसान.
- डिहायड्रेशन
- अस्वस्थता असू शकते
कोलेस्ट्रॉल कसं वाढतं?
खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कोलेस्ट्रॉल झपाट्याने वाढू शकते. यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि कोरोनरी आर्टरी डिसीजचा धोका असतो. शरीरात अनहेल्दी फॅट्स जमा झाल्यामुळे ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात आणि रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. डॉक्टर हाय कोलेस्ट्रॉलमध्ये काळजी घेण्यास सांगतात.
चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त दूध असलेला चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड फॅट वाढतं. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन ब्लड प्रेशर वाढू शकतो. तज्ञांच्या मते, दूध असलेली चहा मेटाबॉलिज्म कमकुवत करू शकते. त्यामुळे शरीरातील फॅट बर्निंग प्रोसेस कमकुवत होते. दुधासोबत जास्त चहा प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आपण हर्बल चहा पिऊ शकता परंतु त्याला एक मर्यादा असावी.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका
- हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं.
- हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका
- छातीत दुखू शकतं.
- हात पाय सुन्न होऊ शकतात.
- गॉलस्टोन होण्याचा धोका
- रक्तप्रवाह कमी होतो.
- जबड्यात समस्या असू शकतात.
- स्मरणशक्तीवर परिणाम, ब्रेन स्ट्रोकचा धोका