आरोग्य सांभाळा! पावसाळ्यात का वाढतो हाय ब्लड प्रेशरचा धोका?; 'असं' ठेवा नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:49 PM2024-07-15T12:49:36+5:302024-07-15T12:57:00+5:30

पावसाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...

heart health high blood pressure problems in monsoon know prevention | आरोग्य सांभाळा! पावसाळ्यात का वाढतो हाय ब्लड प्रेशरचा धोका?; 'असं' ठेवा नियंत्रित

आरोग्य सांभाळा! पावसाळ्यात का वाढतो हाय ब्लड प्रेशरचा धोका?; 'असं' ठेवा नियंत्रित

बदलत्या हवामानाचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. पाऊस पडताच आजारी पडण्याचा धोका वाढतो. या ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रतेमुळे ब्लड प्रेशरमध्ये बदल होतो. हवामानातील बदलामुळे हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो, असं अनेक रिसर्चमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे त्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि तापमानातही वेगाने चढ-उतार होतात. याच दरम्यान ब्लड प्रेशर कमी-जास्त होऊ शकतं. तापमानात वाढलेलं डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलन यामुळे ब्लड प्रेशर रेग्युलेशन प्रभावित होऊ शकतं. हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांना अधिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

पावसाळ्यात का बदलतं ब्लड प्रेशर?

फिजिकल एक्टिव्हिटीज आणि डाएट

पावसाळा आला की फिजिकल एक्टिव्हिटीज आणि खाण्याच्या सवयी बदलतात. अतिवृष्टी किंवा कमी तापमानामुळे फिजिकल एक्टिव्हिटीज कमी झाल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच आहार बदलल्यानेही ब्लड प्रेशरवर परिणाम होतो.

अशक्तपणा असल्यास अधिक धोका

पावसाळ्यात ब्लड प्रेशरमध्ये बरेच बदल होतात. या ऋतूमध्ये अशक्त लोकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. वृद्धांमध्ये हृदयाच्या समस्यांचा धोका जास्त असतो. याशिवाय हाय ब्लड प्रेशर किंवा हृदयाच्या रुग्णांनी या ऋतूत अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

मधुमेहाचे रुग्ण

मधुमेहाच्या रुग्णांना आर्द्रता आणि तापमानातील चढउतारांमुळे डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट असंतुलनाचा धोका जास्त असतो. अशा लोकांनी खाण्यापिण्याबाबत आणि एक्टिव्हिटीजबाबत सतर्क राहावं.

पावसाळ्यात ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं?

- ब्लड प्रेशरवर नियमितपणे लक्ष ठेवा.
- पुरेसे पाणी पीत राहा.
- निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहार फॉलो करा.
- कोणताही आजार किंवा समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 

Web Title: heart health high blood pressure problems in monsoon know prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.