हार्ट मसल्स कमजोर झाल्यास दिसतात ही लक्षणं, मोठी समस्या होण्याआधीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:19 AM2022-02-23T11:19:18+5:302022-02-23T11:19:46+5:30

Heart Muscles : हार्टसंबंधी समस्याच होऊ दिल्या नाहीत किंवा आधीच काळजी घेतली तर काय हरकत आहे? म्हणजे हार्ट मसल्स कमजोर होणं ही एक समस्या आहे.

Heart Muscles : Weak heart muscles symptoms know treatment | हार्ट मसल्स कमजोर झाल्यास दिसतात ही लक्षणं, मोठी समस्या होण्याआधीच व्हा सावध!

हार्ट मसल्स कमजोर झाल्यास दिसतात ही लक्षणं, मोठी समस्या होण्याआधीच व्हा सावध!

Next

Heart Muscles : चुकीच्या लाइफस्टाईलमुळे आजकाल लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यात हार्टसंबंधी आजारही आहेत. भारतात हार्ट संबंधी आजार झाला तर रूग्णांचं जीवन फारच बंधनात येतं. अशात हार्टसंबंधी समस्याच होऊ दिल्या नाहीत किंवा आधीच काळजी घेतली तर काय हरकत आहे? म्हणजे हार्ट मसल्स कमजोर होणं ही एक समस्या आहे. जर वेळीच याची लक्षणं ओळखली तर तुम्हाला जास्त समस्या होणार नाही. 

हार्ट जेव्हा कमजोर होतं तेव्हा ते वेगाने ब्लड पंप करू लागतं,  ज्याने हार्ट मसल्सवर दबाव पडतो आणि मसल्स कमजोर होतात. याचा प्रभाव किडनीवर पडला तर ब्लड फ्लोच्या समस्येसोबत पाण्याची कमतरता होऊ शकते. अशात समस्या अधिक वाढू शकते आणि हृदयावर दबाव वाढू लागतो.

हार्ट मसल्स कमजोर झाल्यास दिसतात ही लक्षणं

असं मानलं जातं की, आपल्या शरीरात कोणताही आजार होण्याआधी त्याची लक्षणं दिसू लागतात. हार्ट मसल्स कमजोर झाल्यावर हृदयाचे ठोके असामान्य होतात. यादरम्यान तुम्हाला श्वास घेण्यास त्रासही होऊ शकतो. तसेच छातीत दुखणंही सुरू होऊ शकतं. पण हे दुखणं हलकं असतं. मात्र ते हळूहळू वाढू लागतं. अशात याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

लक्ष केंद्रीत करण्यात अडचण

जर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करण्यात म्हणजे लक्ष केंद्रीत करण्यात अडचण होत असेल तर हे लक्षण हार्ट मसल्स कमजोर होण्याचा संकेत आहे. याकडेही अजिबात दुर्लक्ष करू नका. असं केलं तर तुमची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

भूक कमी लागणे आणि वेगाने वजन वाढणे

जर तुम्हाला भूक कमी लागत असेल तर हाही हार्ट मसल्स कमजोर झाल्याचा संकेत असू शकतो. त्याशिवाय ज्या लोकांचं वजन वेगाने वाढत आहे त्यांच्याही हार्टचे मसल्स कमजोर होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला काही सवयी बदल्याव्या लागतील. नियमित व्यायाम करावा लागले, चांगला आहार घ्यावा लागेल आणि चांगल्या सवयी लावाव्या लागतील. तर ही समस्या तुमच्यापासून दूर राहील.

(टिप : वरील लेखातील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य ते उपचार घ्या.)

Web Title: Heart Muscles : Weak heart muscles symptoms know treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.