हृदयरोग असलेल्यांना दिला जातो कमी पाणी पिण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 10:29 AM2024-01-12T10:29:15+5:302024-01-12T10:30:10+5:30
तुम्हाला माहीत असायला हवं की, एका दिवसात तुमच्यासाठी किती पाणी गरजेचं आहे.
हार्ट अटॅक आणि सायलेंट अटॅकच्या घटना वाढल्याने हृदयाची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. पाणी प्यायल्याने तुम्हाला जेवढा फायदा होतो, तेवढंच चुका करून नुकसानही होऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला माहीत असायला हवं की, एका दिवसात तुमच्यासाठी किती पाणी गरजेचं आहे.
पाणी पिण्यावरून लोक वेगवेगळ्या चर्चा करतात. कुणी सांगत की, 8 ग्लास पाणी प्यावं, कुणी सांगतं 2 लिटर पाणी प्यावं. पण हृदयरोग असलेल्यांना जास्त किंवा कमी प्यायल्याने खूप नुकसान पोहोचू शकतं. असं आम्ही नाही तर डॉक्टर सांगतात.
हृदयरोग असलेल्यांनी किती प्यावं पाणी
डॉक्टर नेहमीच हृदयरोग असलेल्यांना जास्त पाणी न पिण्याचा सल्ला देतात. कारण याचे काही दुष्परिणाम होतात. हार्ट अॅन्ड स्ट्रोक फाउंडेशननुसार, हार्ट अटॅकच्या रूग्णांनी दिवसभरात 1.5 ते 2 लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. कारण हृदरोगामुळे शरीरात पाणी जमा होऊ लागतं.
कमी पाणी पिणं धोकादायक
जर 6 महिन्यांपासून सतत शरीरात पाणी कमी असेल तर यामुळे क्रोनिक हायपोटेंशन (लो ब्लड प्रेशर) होऊ शकतं. शरीरात 2 ते 5 टक्के पाण्याची कमतरता असेल तर याला माइल्ड डिहाइड्रेशन म्हणतात. तर 5 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी कमी होत असेल तर याला गंभीर डिहायड्रेशन म्हणतात. यापासून वाचण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कमी पाणी प्यायल्याने हृदयाचं किती नुकसान?
माइल्ड डिहाइड्रेशनमुळे झालेल्या लो बीपीमुळे हृदय वेगाने रक्त पंप करतं. यादरम्यान रूग्णाला टॅकीकार्डिया होऊ शकतो. ज्यात हृदय 1 मिनिटात 100 पेक्षा जास्त वेळ धडधड करू लागतो. यामुळे रूग्णाला चिडचिड आणि कमजोरी जाणवू लागते. रूग्णाचा आवाजही थोडा कर्कश होतो आणि तोंड कोरडं पडतं. सोबतच त्वचेवर सुरकुत्या येतात. ही समस्या वाढल्याने लिव्हर आणि मेंदुत रक्त वेगाने फ्लो होतं.
या लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं
अशाप्रकारची समस्या वाढल्याने बॉडीचं हार्मोन सिस्टम अॅक्टिव होतं ज्याला रेनिन-एल्डोस्टेरॉन सिस्टीमही म्हणतात. यात हार्मोन, प्रोटीन आणि एंझाइम मिळून बॉडीचं ब्लड प्रेशर कंट्रोल करतात. ज्यामुळे शरीरात सोडिअम आणि पाणी जमा होतं. अशात धमण्यांमध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
पोस्टुरल हायपोटेंशनचा धोका
जास्त काळ शरीरात पाण्याची कमतरता झाली तर पोस्टुरल हायपोटेंशन होईल आणि उभे राहिल्यावर चक्कर येणे, लो बीपी, कार्डियक फंक्शनमध्ये कमतरता होईल. गंभीर डिहायड्रेशनमुळे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतील आणि रक्त घट्ट होऊ लागतं. रक्त जास्त घट्ट झाल्याने व्यक्तीचा मृत्युही होऊ शकतो.