हृदयरोगाच्या रुग्णांनी लॉंग लाईफसाठी घ्यावा दर २० मिनिटांनी वॉक ब्रेक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:02 AM2018-10-23T11:02:07+5:302018-10-23T11:03:18+5:30
हृदयरोगाच्या रुग्णांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रिसर्चमधून खास उपायाचा खुलासा....
हृदयरागोच्या रुग्णांनी सतत शरीराची हालचाल करणे त्यांच्यासाठी चांगले ठरेल असं एका शोधातून समोर आलं आहे. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी सतत कम्प्युटर किंवा टीव्हीसमोर बसून राहण्यापेक्षा दर २० मिनिटांनी उभं राहणे किंवा थोडा वॉक करणे हे त्यांचं आयुष्य वाढवू शकतात.
याआधी काही रिसर्चमधून समोर आले आहे की, सतत एकाच जागेवर बसून राहणे हे हृदयरोग असलेल्यांचं आयुष्य कमी करु शकतं. पण एकाच जागेवर सतत न बसता थोडा ब्रेक घेणे, फिरणे याने त्यांचं आयुष्य वाढू शकतं. वॉक केल्याने किंवा उभं राहिल्याने ते दिवसाला त्यांच्या ७७० कॅलजी बर्न करु शकतात.
हा अभ्यास Canadian Cardiovascular Congress (CCC) 2018 in Toronto इथे सादर करण्यात आला. या अभ्यासातून किती ब्रेक घेतल्याने, किती वेळासाठी घेतल्याने ७७० कॅलरी ब्रन होतात हे जाणून घेण्यात आले.
अभ्यासाचे लेखक अलिआर रमादी यांनी सांगितले की, 'आमच्या या शोधातून समोर आले आहे की, हृदयरोगाने ग्रस्त व्यक्तींनी दर २० मिनिटांनी शरीराची हालचाल करणे आणि ७ मिनिटांसाठी एक्सरसाइज करणे गरजेचे आहे'.
हृदयरोगाने ग्रस्त व्यक्ती हे फार सोप्या जसे की, काही वेळ उभे राहणे आणि काही वेळासाठी सहर चालणे यातून ७७० पेक्षा जास्त कॅलरी एका दिवसात बर्न करु शकतात'.
हा अभ्यास १३२ coronary artery disease असलेल्या रुग्णांवर करण्यात आला. यात ६३ ते ७७ या वयोगटातील रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात हे निरीक्षण करण्यात आलं की, रुग्णांनी किती ब्रेक घेतल्यावर किती एनर्जी घालवली, किती वेळासाठी ब्रेक घेतला आणि किती वेळानंतर ब्रेक घेतला. यातून हे स्पष्ट झाले की, एकाच जागेवर सतत बसून राहणे हे आरोग्यासाठी फारच घातक आहे.