हृदय निरोगी ठेवण्यासाठी 'या' ६ गोष्टींपासून रहा दूर, डॉक्टरांनी दिल्या खास टिप्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 10:18 AM2024-11-02T10:18:10+5:302024-11-02T10:18:49+5:30
Heart Disease Causes : हार्ट सर्जन डॉ. जेरेमी लंडन, एमडी यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं ज्या हृदयरोगाला कारणीभूत ठरतात.
Heart Disease Causes : जगभरात हृदयरोगांमुळेच सगळ्यात जास्त मृत्यू होतात. हृदयरोगांचा धोका महिला, पुरूष, तरूण, वृद्ध कुणालाही असतो. जर तुम्ही लाइफस्टाईल बरोबर नसेल तर कुणीही हृदयरोगाचे शिकार होऊ शकतात.
गेल्या २५ वर्षांपासून बायपास हार्ट सर्जरी करणारे यूरोपचे हार्ट सर्जन डॉ. जेरेमी लंडन, एमडी यांनी अशा काही गोष्टींबाबत सांगितलं ज्या हृदयरोगाला कारणीभूत ठरतात. इतकंच नाही तर त्यांनी यामागचं कारणही सांगितलं.
अल्कोहल बेस्ड माउथवॉश
डॉ. लंडन म्हणाले की, अल्कोहल बेस्ड माउथवॉश ब्लड प्रेशरवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. याने नुकसानकारक बॅक्टेरियासोबतच चांगले बॅक्टेरियाही नष्ट होतात. हे चांगले बॅक्टेरिया धमण्यांना पातळ होण्यापासून रोखतात.
स्मोकिंग आणि वेपिंग
स्मोकिंग किंवा वेपिंगमुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्याशिवाय जास्त निकोटिनचं सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढण्याचा देखील धोका असतो.
मद्यसेवन
डॉ. लंडन यांनी सांगितलं की, तीन वर्षाआधी त्यांनी दारू पिणं सोडलं. त्यांचं मत आहे की, दारू सगळ्याच कोशिकांसाठी टॉक्सिक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दारूचं सेवन नुकसानकारकच मानलं आहे.
कोल्ड ड्रिंक
डॉ. लंडन कोल्ड ड्रिंक्सला 'लिक्विड डेथ' असं म्हणतात. कारण यात कॅलरी जास्त प्रमाणात असतात. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका अधिक वाढतो.
रिफाइंड पिठाचे फूड्स
कडधान्याच्या उत्पादनांचं सेवन करणं चांगलं असतं. रिफाइंड पिठात फायबर आणि आवश्यक पोषक तत्व कमी असतात. कडधान्य कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स
कुकीज, चिप्स आणि प्रेट्जेल सारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्सचं सेवन केल्याने हृदयरोग आणि मृत्यूचा धोका वाढतो. एक्सपर्ट सांगतात की, तुम्ही जेवढं जास्त या फूड्सचं सेवन कराल तेवढं तुमचं आयुष्य कमी होतं.