काहीही खाल्ल्यावर छातीत जळजळ होते का? करा हे 4 उपाय लगेच मिळेल आराम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 11:04 AM2022-12-06T11:04:09+5:302022-12-06T11:06:13+5:30
Heartburn Reduce Tips: मुळात आपण जे खातो ते अनेकदा छोट्या आतड्यांमध्ये जाण्याऐवजी परत फूड पाइप म्हणजे अन्ननलिकेत येतं. ज्यामुळे ही समस्या होऊ लागते. तुम्हाला अशी समस्या होऊ नये म्हणून आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
Heartburn Reduce Tips: बऱ्याच लोकांचं पचन तंत्र हे इतर लोकांच्या तुलनेत कमजोर असतं. ज्यामुळे काहीही तळलेलं-भाजलेलं किंवा तिखट खाल्लं तर त्यांना आंबड ढेकर व छातीत जळजळ होऊ लागते. त्यासोबतच त्यांना मळमळ होऊ लागते. या सगळ्याला अॅसिड रिफ्लॅक्स असं म्हणतात. मुळात आपण जे खातो ते अनेकदा छोट्या आतड्यांमध्ये जाण्याऐवजी परत फूड पाइप म्हणजे अन्ननलिकेत येतं. ज्यामुळे ही समस्या होऊ लागते. तुम्हाला अशी समस्या होऊ नये म्हणून आम्ही काही उपाय सांगणार आहोत.
अन्न बारीक चावून खावे
जर काहीही खाल्लं तरी तुम्हाला छातीत जळजळ होत असेल तर ही समस्या टाळण्यासाठी सगळ्यातआधी अन्न चांगलं बारीक चावून खावं. असं केल्याने तुम्हाला जळजळ होणार नाही. सोबतच पाणी भरपूर प्यावं. याने तुम्हाला अॅसिडीटी आणि जळजळ ही समस्या होणार नाही.
या पदार्थांच करू शकता सेवन
छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही रताळे, गाजर, ब्राउन राइस आणि ओट्ससारख्या पदार्थांचं सेवन करू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या होणार नाही. तुम्ही रोजच्या आहारातही या पदार्थांचं सेवन करू शकता.
उजव्या बाजूने झोपा
पचनात समस्या झाल्यावर किंवा आंबट ढेकर आल्यावर तुम्ही डाव्या कडावर झोपा. असं केल्याने छोट्या आतड्यांमधील वेस्ट प्रॉडक्ट्स मोठ्या आतडीमध्ये जाण्यास जागा तयार होते. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते. तेच पाठीवर झोपाल तर समस्या अधिक जास्त वाढते.
पाणी पिऊन फिरल्यास आराम मिळतो
जेव्हाही पोटात अॅसिड जास्त तयार होऊ लागतं तेव्हा खोकला आणि छातीत वेदना होऊ लागते. अशात तुम्ही औषधाचंही सेवन करू शकता किंवा मग पाणी पिऊन थोडावेळ फिरावं. यानेही तुम्हाला आराम मिळू शकतो.