Heat Stroke Symptoms: ही लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध, हीट स्ट्रोकचा बसू शकतो फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 11:53 AM2023-04-22T11:53:29+5:302023-04-22T11:53:48+5:30

Heat Stroke Symptoms: सीडीसीनुसार, याचा धोका वयोवृद्ध लोकांना, हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आणि जास्त वेळ उन्हाळात किंवा उष्णतेमध्ये काम करणार्या लोकांना असतो.

Heat Stroke Symptoms: Early signs and symptoms of heat stroke and first aid | Heat Stroke Symptoms: ही लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध, हीट स्ट्रोकचा बसू शकतो फटका

Heat Stroke Symptoms: ही लक्षणं दिसताच वेळीच व्हा सावध, हीट स्ट्रोकचा बसू शकतो फटका

googlenewsNext

Heat Stroke Symptoms: उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान खूप वाढलं आहे. अशात लोकांना हीट स्ट्रोकपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण हीट स्ट्रोकची लक्षण काय आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला याची लक्षण सांगणार आहोत. अनेकांना माहीत नाही की, आधी व्यक्तीला हीट एक्झॉशन होतं, जे वेळीच बरं केलं नाही तर हीट स्ट्रोक येऊ शकतो.

हीट एग्जॉशन कसं होतं?

जास्त उष्णतेमुळे शरीरातून फार जास्त पाणी आणि मीठ निघून जातं. त्यामुळे हीट एक्झॉशन होतं. सीडीसीनुसार, याचा धोका वयोवृद्ध लोकांना, हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांना आणि जास्त वेळ उन्हाळात किंवा उष्णतेमध्ये काम करणार्या लोकांना असतो.

हीट स्ट्रोकआधी दिसतात ही लक्षण

डोकेदुखी

मळमळ वाटणे

डोकं गरगरणे

कमजोरी

चिडचिड वाढणे

सतत तहान लागणे

जास्त घाम येणे

शरीराचं तापमान वाढणे

लघवी कमी येणे

काय कराल उपाय

जर तुम्ही फार जास्त उन्ह किंवा गरम हवेत असाल आणि हीट एक्झॉशनचं कोणतंही लक्षण दिसत असेल तर लगेच सावलीमध्ये जा. तिथे बसून थोडं थंड पाणी प्या. शरीराचं तापमान नॉर्मल होईपर्यंत कोणतंही काम करणं टाळा.

उन्ह लागणं म्हणजेच हीट स्ट्रोक

सामान्य भाषेत हीट स्ट्रोकलाच उन्ह लागणं म्हणतात. यात शरीर स्वत:ला थंड करू शकत नाही आणि 10 ते 15 मिनिटात शरीराचं तापमान 106 डिग्री फारेनहाइटपर्यंत पोहोचतं. जर या स्थितीत लगेच उपचार मिळाला नाही तर जीवाला धोकाही होऊ शकतो.

हीट स्ट्रोकची लक्षण

कन्फ्यूजन

स्पष्ट बोलू न शकणे

शरीराचं तापमान वाढणे

फार जास्त घाम येणे

झटके येणे

काय करावे उपाय?

सीडीसीनुसार, ही समस्या झाल्यावर व्यक्तीला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यावं. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत खालील काही उपाय करावे.

रूग्णाला थंड आणि उन्हाच्या ठिकाणाहून दूर न्यावं

शक्य असेल तर रूग्णाची बर्फाच्या थंड पाणी आंघोळ घालावी

त्वचा ओली करावी

त्वचेवर थंड ओला कपडा ठेवावा

रूग्णाच्या आजूबाजूला मोकळी हवा असावी

डोकं, मान, काख आणि मांड्यावर ओला कपडा ठेवावा.

Web Title: Heat Stroke Symptoms: Early signs and symptoms of heat stroke and first aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.