सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 04:50 PM2023-04-14T16:50:00+5:302023-04-14T16:58:46+5:30

उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो.

heat stroke symptoms must be protected from heat stroke in summer | सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

सावधान! उष्णतेच्या लाटेपासून राहा अलर्ट अन्यथा पडाल आजारी; आतापासून घ्या ‘ही’ खबरदारी

googlenewsNext

उन्हाळा सुरू झाला आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली आहे. अशा स्थितीत उन्हाळ्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका आहे. साधारणपणे उष्णतेची लाट चालू असताना उष्माघाताचा धोका जास्त असतो. बर्‍याच वेळा लोकांना स्ट्रोक येतो, त्यामुळे मळमळ, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशा तक्रारी दिसतात. उष्णतेच्या लाटेमुळे लहान असो वा मोठे... कोणालाही त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत उष्णतेची लाट कशी टाळायची हे जाणून घेण्याची गरज आहे. 

आहारात नारळ पाण्याचा समावेश करा

येत्या काही दिवसांत उष्ण वारे वाहू लागतील. थोडासा निष्काळजीपणा महागात होऊ शकतो. अशा परिस्थितीत नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा. मुले सहसा कमी पाणी पितात. नारळाच्या पाण्याने त्यांना फायदा होऊ शकतो. नारळाच्या पाण्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात. याचा त्यांना फायदा होऊ शकतो.

पाणी प्या

प्रत्येक नागरिकाने दररोजच्या पाणी पिण्याच्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. लिंबू-सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हे, ताक असे पाण्याचे प्रमाण अधिकाधिक असणारे द्रव पदार्थ घ्यावेत.

काकडी खावी

उष्णता टाळायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. हे टाळण्यासाठी अशा खाद्यपदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे शरीरात पाण्याचा पुरवठा होत राहतो. काकडी हा एक चांगला पर्याय असू शकतो. काकडीत व्हिटॅमिन ए, बी, के आणि फायबर जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. ते खाल्ल्याने उष्माघात टाळण्यास मदत होते.

पाय पाण्यात बुडवून ठेवा

पायाचे तळवे खूप गरम होतात. त्यातून निघणारी उष्णता थेट डोक्यावर येते. हे टाळण्यासाठी तुमचे पाय बादलीत किंवा थंड पाण्याच्या टबमध्ये बुडवून ठेवा. चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करत राहा.

काय काळजी घ्याल?

अंगात सैलसर आणि फिकट रंगाचे कॉटनचे कपडे घालावे. डोक्याला पांढरा रुमाल बांधूनच बाहेर पडावे. उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये, दिवसभरात जास्तीत जास्त द्रवपदार्थ सेवन करावेत, उन्हात बाहेर पडताना डोळ्यांवर गॉगल लावावा, फळांचं जास्तीत जास्त सेवन करावं. नारळपाणी, विविध फळांचे रस, काकडीचे प्रमाण वाढवावे.

असा घ्या आहार

पचायला हलका व पाण्याचा घटक अधिक असलेला आहार घ्यावा. मुगाची खिचडी किंवा वरण तसेच सर्व पालेभाज्यांचं प्रमाण आहारात वाढवावे. टरबूज, खरबूज, संत्री, मोसंबी, केळी, सीताफळ, काकडी, द्राक्षे इत्यादी फळांचे सेवन वाढवावे. तुपाचाही आहारात समावेश करावा. नारळपाणी, उसाचा रस, कोकम सरबत, नीरा तसेच फळांचा ताजा रस घ्यावा. जेवणानंतर ताकही अवश्य प्यावं. उन्हाळ्याच्या दिवसांत मांसाहार शक्यतो टाळावा.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: heat stroke symptoms must be protected from heat stroke in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.