सतत मास्कच्या वापरानं शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?, तज्ज्ञ सांगतात की....

By manali.bagul | Published: October 4, 2020 05:04 PM2020-10-04T17:04:14+5:302020-10-04T17:27:44+5:30

Health News & CoronaVirus Research : मास्कमुळे शरीराबाहेर फेकला जाणारा कार्बन डायऑक्साइड्सचं शरीरात पुन्हा जातो, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं सांगितलं जातं आहे. या दाव्यामागचं सत्य सांगणारं  एक संशोधन समोर  आलं आहे. 

Heath Tips in marathi : Face mask cause over exposing to carbon dioxide cause breathing problem | सतत मास्कच्या वापरानं शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?, तज्ज्ञ सांगतात की....

सतत मास्कच्या वापरानं शरीरात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढतं?, तज्ज्ञ सांगतात की....

Next

कोरोना व्हायरसच्या माहामाहारीत जीवघेण्या आजारापासून बचावासाठी मास्कचा वापर करणं अनिवार्य आहे. मास्कचा वापर केला नाही तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे. म्हणून  सर्वच पातळीवर लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केलं जात आहे. पण मास्क लावण्याची सवय याआधी वैद्यकिय क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांना वळगता कोणालाही नव्हती. अचानक मास्कचा वापर वाढल्यामुळे अनेकांना गुदमरतं, श्वास घ्यायला  त्रास होतो, डोकं दुखतं तर अनेकांना वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. मास्कमुळे शरीराबाहेर फेकला जाणारा कार्बन डायऑक्साइड्सचं शरीरात पुन्हा जातो, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं सांगितलं जातं आहे. या दाव्यामागचं सत्य सांगणारं  एक संशोधन समोर  आलं आहे. 

अनल्स ऑफ द अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. अमेरिकेतील मियामी विद्यापीठातील शास्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे. मास्क लावल्यामुळे  कार्बन डायऑक्साइड शरीरात जाऊन धोका उद्भवतो किंवा दम लागून त्रास होऊ शकतो हे दोन्हीही दावे चुकीचे असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे. निरोगी व्यक्तींसह सीओपीडीची समस्या असेलल्या रुग्णांचाही अभ्यास करण्यात आला. मास्क वापरण्यापूर्वी आणि मास्क वापरल्यानंतर या सर्वांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी तपासली होती.

खुशखबर! २०२१ च्या जुलैपर्यंत भारतातील २५ कोटी लोकांना देणार कोरोनाची लस, आरोग्यमंत्र्यांचा खुलासा

या संशोधनातून समोर आलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देताना तज्ज्ञ मायकेल कॅम्पोस यांनी सांगितले की, "COPD च्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. मास्क लावल्यावर त्यांना दम किंवा धाप लागू शकते. ज्या लोकांना फुफ्फुसांशी संबंधित आजार आहेत त्या रुग्णांवरही मास्क लावल्याने फारच कमी प्रमाणात परिणाम होतो. तुम्ही जेव्हा वेगात चालता किंवा एखादी टेकडी चढता तेव्हाही तुम्हाला दम लागतो.

त्यामुळे मास्क वापरल्यामुळे दम लागल्यास जीवाला धोका अजिबात नाही.  कोरोना पासून बचावासाठी मास्कचा वापर करायला हवा. मोकळ्या, सुरक्षित ठिकाणी असल्यास मास्क काही वेळासाठी काढून टाकण्यास हरकत नाही जेणेकरून तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होणार नाही. पण गर्दीच्या ठिकाणी मात्र लावायलाच हवा. ",असा सल्ला कॅम्पोस यांनी दिला आहे.

दिलासादायक! लॉकडाऊनचा आरोग्यावर चांगला परिणाम; कमी झाले 'या' आजाराचे रुग्ण, रिसर्च 

 कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत संसर्गाची भीती कायम

'कोविड- १९' रुग्णांमध्ये जे गंभीररित्या आजारी आहेत. ते ९० दिवस संक्रमित असतात, असे अमेरिकेतील अटलांटा येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीत आढळले होते. अमेरिकेतील एजन्सीच्या विश्लेषणानुसार, कोरोनापासून रिकव्हर झालेले लोक १५ मिनिटांत दुसऱ्याला व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरवू शकतात. तसेच, जर कोणताही आजार अशा रुग्णांना ९० दिवसांनंतर झाला, तर तो कोरोना नव्हे, असेही यामध्ये म्हटले होते 

आयसोलेशन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये RT-PCR पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती असल्याचे दिसून आले. या कॅटगरीमधील रुग्णांची तपासणी दर आठवड्याला केली जात आहे. अँटिबॉडीच्या पातळीनुसार,  त्यांना पुन्हा ड्युटीवर घेण्याबाबत ठरविले जाते, असे केअर हॉस्पिटलचे रोगतज्ज्ञ डॉ. मुस्तुफा अफझल यांनी सांगितले होते.

Web Title: Heath Tips in marathi : Face mask cause over exposing to carbon dioxide cause breathing problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.