सतत लघवी येत असेल तर असू शकतो डायबिटीस इंसिपिडसचा धोका, जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:34 AM2020-02-05T10:34:14+5:302020-02-05T10:37:30+5:30
आपण नेहमी बघतो की लहान आजारांचे सुद्धा मोठ्या आजारात रुपांतर होते.
आपण नेहमी बघतो की लहान आजारांचे सुद्धा मोठ्या आजारात रुपांतर होतं. तुम्हाला डायबिटीस हा आजार माहीत असेल. याच आजाराच्या प्रकाराबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. डायबिटीस मलायट्स आणि डायबिटिस इंसिपिड्स हे दोन डायबिटीसचे प्रकार आहेत. साखरेतील इन्सुलिनच्या प्रमाणामुळे उद्भवत असलेल्या प्रकराला डायबिटीस मलायट्स म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे डायबिटीस इंसिपिडस.
(image credit- medlife)
डायबिटीस इंसिपिडस या आजारात शरीरातील द्रव पदार्थामध्ये बदल घडून येत असतो. त्यामुळे सतत लघवी येण्याचा त्रास होतो. तहान सुद्धा गरजेपेक्षा जास्त लागते. या समस्येमुळे रात्री व्यवस्थित झोप सुद्धा येत नाही. पण जर झोप आली तरी तुमचं अंथरूण ओलं होण्याचा धोका असतो. डायबिटीस इंसिपिडस हा असामान्य असा आजार आहे. जो महिलांच्या तुलनेत पुरूषांमध्ये जास्त दिसून येतो. या आजाराची लक्षणं जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्वतःला हा आजार जास्त वाढत जाण्यापासून वाचवू शकता.
लक्षणं
लघवी पातळ होणे.
लघवीचा रंग जास्त पिवळा असणे.
रात्री जास्तवेळा लघवी लागणे.
उलटी आणि ताप येणे.
वजन कमी होणे
त्वचा कोरडी पडणे.
अति तहान लागणे.
डायबिटीस इंसिपिडस तुमच्या पिट्यूटरी ग्लॅड्सला इजा पोहोचवू शकतो. त्यानंतर शरीरात एक तरल पदार्थ तयार होतो. त्यामुळे मुत्रात असंतुलन निर्माण होतं. मुत्राशयात जास्त मुत्र जमा झाल्यानंतर मुत्रावाटे बाहेर पडत जाते. कारण त्यावेळी शरीराताल तरल पदार्थ तयार होण्यासाठी आणि मुत्राचे प्रमाण कमी होण्यासाठी ADH हार्मोन किडनीत कार्यरत असतो. या हार्मोनला वॅसोप्रोसिन असं सुद्धा म्हणतात. हाइपोथॅलेमस पिट्यूटरी ग्लॅड्समध्ये स्टोअर होत असतं. या आजाराचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा परिणाम सुद्धा वेगवेगळा होत असतो. या आजाराच्या प्रकारांबद्दल जाणून घ्या.
सेंट्रल डायबिटीस इंसिपिडस- हा प्रकार सर्जरी, ट्यूमर, मेनिन्जाइटिस, आनुवंशिक विकार किंवा जखमा झाल्यामुळे सुद्धा धोका असतो.
नेफ्रोजेनिक डायबिटीस इंसिपिडस- यात किडनीच्या नलिकांना समस्या उद्भवत असतात.
जेस्टेशनल डायबिटीस इंसिपिडस- हा आजार गर्भावस्थेत असताना होत असतो. या आजारात गर्भवती महिलेच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते. ( हे पण वाचा-World Cancer Day : कॅन्सरची लक्षणं आधीच माहीत असतील तरच टाळता येईल मृत्यूचा धोका!)
उपाय
तहान लागल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. आवश्यकता असेल तितक्याच प्रमाणात पाण्याचे सेवन करा.
स्वतःचं उपचार करू नका. पाणी शरीरात न राहता लघवी करताना सतत बाहेर पडत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
जास्त ताप किंवा जास्त घाम येत असेल तर त्वरित वैद्यकिय तपासणी करा. ( हे पण वाचा-जागतिक कर्करोग दिन : शरीरातील प्रतिकारशक्ती कर्करोगापासून ठेवते दूर)