उंची अन् हृदयरोगाचा थेट संबंध, संशोधनात दावा; जाणून घ्या उंचीनुसार तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 01:34 PM2021-09-19T13:34:59+5:302021-09-19T13:35:01+5:30
माणसाची उंची आणि त्याला होणारे आजार यांचा थेट संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आघाडीच्या संस्थांनी गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
माणसाची उंची आणि त्याला होणारे आजार यांचा थेट संबंध असल्याचे वैद्यकीय संशोधनातून समोर आले आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आघाडीच्या संस्थांनी गेल्या काही वर्षात केलेल्या संशोधनानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
या निष्कर्षा प्रमाणे कमी उंचीच्या व्यक्तींना मधुमेह आणि हृदयविकाराचा जास्त धोका असतो. तसेच या व्यक्तींना कमी वयात टक्कल पडण्याची शक्यताही अधिक असते. तर उंच व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते असे या संशोधनात म्हटले आहे. उंच महिलांमध्ये कर्करोगाचा धोका जास्त असू शकतो.
तर कमी उंचीच्या महिलांना गर्भारपणाच्या कालावधीत दिवस पूर्ण होण्यापूर्वीच बाळ जन्माला येण्याची शक्यता अधिक असते. पाच फूट नऊ इंच पेक्षा जास्त उंची असणाऱ्या महिलांमध्ये कर्करोग होण्याचे प्रमाण ३३ टक्के जास्त असते. तर पाच फूट तीन इंच पेक्षा कमी उंची असणाऱ्या व्यक्तींसाठी हृदयरोगाचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या दोन हजार पेक्षा जास्त संशोधनात उंची आणि हृदयविकार यांचा थेट संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
जास्त उंची असणाऱ्या लोकांमध्ये ब्लड क्लॉटिंगचे प्रमाण जास्त असू शकते. माणसाच्या उंचीप्रमाणे त्याच्या शरीरातील रक्तवाहिन्या आणि हार्मोन्स यांचे कार्य चालत असल्याने विविध आजारांचे हे परिणाम दिसून येत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये लंडनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, जर्मनीतील वान युनिव्हर्सिटी, ओहियो येथील रिसर्च सेंटर, स्वीडनमधील यूनिवर्सिटी, हॉस्पिटल फिनलंड मधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकी, जर्मनीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन न्यूट्रिशन या विविध संस्थांनी केलेल्या संशोधनातून हे सर्व निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.