पालकांनो व्हा सावध! लहान मुलांमध्ये रहस्यमयी आजाराचे थैमान; थेट लिव्हरवर करतोय अटॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 04:09 PM2022-04-25T16:09:16+5:302022-04-25T16:10:45+5:30

एका रहस्यमयी व्हायरसमुळे हेपेटायटीसची 108 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणे लहान मुलांशी संबंधित आहेत.

hepatitis among children spreading due to mysterious virus in britain death of one child who engaged in investigation | पालकांनो व्हा सावध! लहान मुलांमध्ये रहस्यमयी आजाराचे थैमान; थेट लिव्हरवर करतोय अटॅक

पालकांनो व्हा सावध! लहान मुलांमध्ये रहस्यमयी आजाराचे थैमान; थेट लिव्हरवर करतोय अटॅक

Next

गेल्या काही वर्षांत जगात विविध आजारांचा कहर पाहायला मिळत आहे. माणसाला एका आजाराचा सामना करण्यातही यश येत नाही तोपर्यंत दुसरा नवीन आजार डोके वर काढतो. या वेळी जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य सेवेशी संबंधित लोकांच्या लोकांची चिता वाढली आहे. हेपेटायटीस हा एक लिव्हरचा आजार आहे. ज्यामध्ये लिव्हरला सूज येते. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की अलीकडेच नवीन हेपेटायटीससची 130 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी बहुतेक ब्रिटनमधील आहेत.

जानेवारीपासून, ब्रिटनमध्ये एका रहस्यमयी व्हायरसमुळे हेपेटायटीसची 108 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणे लहान मुलांशी संबंधित आहेत. याशिवाय अमेरिका, इस्रायल, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड आणि स्पेनमध्येही रहस्यमयी व्हायरसटच्या हेपेटायटीसचे प्रकरण नोंदवले गेले आहेत. हेपेटायटीसची ही प्रकरणे इतकी गंभीर आहेत की अनेक मुलांनी लिव्हर प्रत्यारोपणाचाही सामना केला आहे. वैद्यकीय जगताशी संबंधित लोकही या प्रकरणांबद्दल चिंतेत आहेत कारण सामान्यतः उद्भवणार्‍या व्हायरसमुळे असे होत नाही. सामान्यतः ए, बी, सी, डी आणि ई व्हायरस हेपेटायटीस होण्यास जबाबदार असतात.

बार्सिलोनामधील हिपॅटोलॉजीच्या प्राध्यापिका आणि यूरोपियन असोसिएशन ऑफ दि स्टडी ऑफ दि लीवर पब्लिक हेल्थ कमेटीच्या प्रमुख मारिया बूटी म्हणतात की हेपेटायटीसची प्रकरणे अजूनही फारच कमी आहेत. पण हे सर्व मुलांशी संबंधित असल्याने ही बाब गंभीर आहे. हेपेटायटीसच्या या प्रकरणांबाबत, पब्लिक हेल्थ स्कॉटलँडचे संचालक जिम मॅक्मिनेमिन म्हणाले की, हेपेटायटीस अधिक गंभीर बनवण्यासाठी एडीनो व्हायरसचा नवा म्यूटेंट कारणीभूत आहे का यावर आधीच संशोधन केले जात आहे. 

इतर काही व्हायरस मिळाल्याने ही समस्या अधिक गंभीर होत आहे का, याचा अभ्यास आता शास्त्रज्ञ करत आहेत. तज्ज्ञ कोविड-19 असतानाही हा व्हायरस होण्याची शक्यता शोधण्यात व्यस्त आहेत. मात्र, कोरोना लसीमुळे गंभीर हेपेटायटीसची शंका फेटाळण्यात आली आहे. कारण या आजाराने बाधित झालेल्या इंग्लंडमधील मुले लसीकरणाच्या वयाखाली येत नाहीत. यामागचे एक कारण असेही सांगितले जात आहे की लॉकडाऊन दरम्यान मुलांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे हेपेटायटीस आजाराची तीव्रता वाढत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: hepatitis among children spreading due to mysterious virus in britain death of one child who engaged in investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य