लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर 5 सुपरफूड, Hepatitis सोबत 10 आजारांचा धोका होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:48 PM2022-07-28T12:48:01+5:302022-07-28T12:48:10+5:30

Liver health: लिव्हर कमजोर होण्याची लक्षणं - लिव्हर कमजोर किंवा खराब झाल्यावर उलटी, कमी भूक लागणे, थकवा, जुलाब, काविळ, वजन कमी होणं, शरीरावर खाज, एडिमा, पोटात तरल पदार्थ तयार होणं इत्यादी लक्षणं दिसू लागतात.

Hepatitis day 2022 : Know 5 superfood for prevention liver disease according to ncbi | लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर 5 सुपरफूड, Hepatitis सोबत 10 आजारांचा धोका होईल कमी

लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर 5 सुपरफूड, Hepatitis सोबत 10 आजारांचा धोका होईल कमी

googlenewsNext

Liver health: लिव्हर शरीरातील सर्वात मोठं आणि महत्वाचं अवयव असतं. लिव्हर आपल्या शरीरात जवळपास 500 कार्य करतं. ज्यात आपण खाल्ल्येल्या अन्नापासून पित्त तयार करण्यापासून, पोषक तत्व आणि व्हिटॅमिन्स कायम ठेवणं आणि शरीराला संक्रमणापासून वाचवण्याचा समावेश आहे. लिव्हर अल्कोहोल, औषधं आणि मेटाबॉलिज्मचे बायप्रॉडक्ट्स सारखे विषारी  पदार्थही तोडतो. अशात जर तुमचं लिव्हर अनहेल्दी राहीलं तर याचा प्रभाव पूर्ण शरीरावर पडतो.

लिव्हर कमजोर होण्याची लक्षणं - लिव्हर कमजोर किंवा खराब झाल्यावर उलटी, कमी भूक लागणे, थकवा, जुलाब, काविळ, वजन कमी होणं, शरीरावर खाज, एडिमा, पोटात तरल पदार्थ तयार होणं इत्यादी लक्षणं दिसू लागतात. लिव्हर खराब होण्याची कारणेही वेगवेगळी आहेत. लिव्हर खाण्याच्या चुकीच्या सवयींसोबतच अल्कोहोलचं सेवन, एक्स्ट्रा फॅट, इन्फेक्शन, जास्त प्रमाणात आयर्न व कॉपर, टॉक्सिक डॅमेज आणि कॅन्सरमुळे होतं. अशात तुम्ही लिव्हरसंबंधी अनेक आजारांचे शिकार होता.

लिव्हरसंबंधी सर्वात कॉमन आजार म्हणजे  हेपेटायटिस व्हायरसमुळे होणारा हेपेटायटिस ए, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी आहेत. आज 28 जुलैला जगभरात हेपेटायटिस दिवस पाळला जातो. अशात आम्ही तुम्हाला आज लिव्हरला मजबूत ठेवणाऱ्या सुपरफूड्सबाबत सांगणार आहोत.

क्रूसिफेरस भाज्या

ब्रोकली, फ्लॉवर, ब्रेसल्स स्प्राउ्टस, कोबी आणि केल सारख्या भाज्यांमध्ये ग्लूटाथियोन असतं, जे लिव्हरच्या टॉक्सिन क्लीजिंग एंजाइमला किकस्टार्ट करतं. हे खाल्ल्याने तुमच्या सिस्टीममध्ये ग्लूकोसायनोलेटचं उत्पादन वाढतं. जे कार्सिनोजेन्स आणि इतर विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं.

ऑलिव्ह ऑइलचे फायदे

ऑलिव्ह ऑइलमध्ये फॅट असतं. पण सामान्यपणे याला फायदेशीर मानलं जातं. एनसीबीआयमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, ऑलिव्ह ऑइलच्या सेवनाने लिव्हरमधील फॅटचं प्रमाण कमी करण्यास, रक्तप्रवाह वाढवण्यास आणि लिव्हर एंजाइमचं प्रमाण सुधारण्यास मदत करतं.

ग्रीन टी

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या एका रिपोर्टमधून समोर आलं की, ग्रीन टी लिव्हरसाठी फायदेशीर असते. ग्रीनमध्ये अॅंटीऑक्सिडेंट असतात. ज्याला कॅटेचिन नावाने ओळखलं जातं. याने लिव्हरवरील सूज कमी होते.

लिव्हरसाठी फायदेशीर फळं

आंबट फळ लिव्हरला उत्तेजित करतात आणि विषारी पदार्थ दूर करण्यास मदत करतात. द्राक्ष खासकरून अशात फायदेशीर ठरतात. कारण यात नारिंगिन असतात, जे अॅंटी-ऑक्सिडेंट असतं. याने लिव्हरवरील सूज कमी होण्यास मदत मिळते. पण द्राक्ष काही औषधांवर परस्पर क्रिया करू शकतं. त्यामुळे द्राक्ष खाणार असाल तर आधी डॉक्टरांशी संपर्क करा.

लिव्हरसाठी फायदेशी लसूण

लसूण एक सल्फर आहे. जे लिव्हरमधील एंजाइम सक्रिय करतं. याने तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ आणि अपशिष्ट पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते. यात सेलेनियम असतं जे लिव्हरचं नुकसान होण्यापासून वाचवतं.

Web Title: Hepatitis day 2022 : Know 5 superfood for prevention liver disease according to ncbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.