कोळ्याची भिती का वाटते?; जाणून घ्या यामागील खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:32 PM2019-09-11T12:32:42+5:302019-09-11T12:36:24+5:30

पाल, झुरळ, कोळी यांसारख्या किटकांना आपल्यापैकी अनेकजण घाबरतात. समोर दिसताच क्षणी गोंधळ घालायला सुरुवात होते. अशातच जर्मनमधील काही मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील कारण एका संशोधनातून शोधून काढलं आहे.

Here are the reasons why are we afraid of spiders? | कोळ्याची भिती का वाटते?; जाणून घ्या यामागील खरं कारण

कोळ्याची भिती का वाटते?; जाणून घ्या यामागील खरं कारण

Next

पाल, झुरळ, कोळी यांसारख्या किटकांना आपल्यापैकी अनेकजण घाबरतात. समोर दिसताच क्षणी गोंधळ घालायला सुरुवात होते. अशातच जर्मनमधील काही मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील कारण एका संशोधनातून शोधून काढलं आहे. मानसोपचार तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, भिती वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.

कोळ्याची भिती वाटणाऱ्या लोकांची नजर साधारणतः अशाच प्रकारच्या किटकांवर इतरांपेक्षा लगेच पडते. जर्मनीतील मनहाइम युनिवर्सिटीतील मानसोपचार तज्ज्ञ आंत्ये गेर्देस आणि ग्योग्र आल्पर्स यांनी सांगितले की, ज्या व्यक्ती घाबरतात त्यांच्या कल्पनेमध्ये हे प्राणी जास्त वेळ दिसतात. 

आल्पर्स यांनी सांगितले की, 'आमच्या संशोधनानुसार, भितीमुळे निर्माण झालेल्या उत्तजनेमुळे हे ठरतं की, आपल्याला समोर दिसणाऱ्या एखाद्या गोष्टीचा आपल्यावर कसा परिणाम होतो. आपल्या प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या आजूबाजूची परिस्थितीही आपल्याला वेगवेगळी दिसू शकते.' त्यामुळे जेव्हा कोळ्याला घाबरणाऱ्या व्यक्ती जेव्हा त्यांच्यासोमोर असलेल्या आठ पायांच्या कोळ्याचं वर्णन करतात. त्यावेळी अनेकजण ते खोटं बोलत आहेत किंवा वाढवून सांगत आहेत. असं समजतात. पण असं अजिबात न करता. ते त्यांना वाटणाऱ्या गोष्टीचं वर्णन करत असतात, हे लक्षात घ्यावं. 

दोन फोटोंची टेस्ट 

ज्या व्यक्तींवर टेस्ट करण्यात आली त्यांना मानसोपचारतज्ज्ञांनी दोन फोटो दाखवले. यामध्ये तज्ज्ञांनी आणखी एक ट्विस्ट ठेवला, तो म्हणजे, उजवा फोटो फक्त उजव्याच डोळ्यांना दिसणार आणि डावा फोटो फक्त डाव्या डोळ्यालाच. आल्पर्स यांनी सांगितलं की, दोन्ही फोटो सतत एकत्र पाहणं शक्य नाही. त्यामुळे दोन्ही डोळ्यांमध्ये स्पर्धा रंगते. पण यामध्ये मेंदू फार कन्फ्युज होतो आणि दोघांपैकी एकाचीच निवड करतो. पण यासर्व गोष्टींमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग अजिबात नसतो. 

फुलावर कोळ्याचा विजय

स्विच सुरू केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला सांगायचं असतं की, त्यांनी काय पाहिलं? त्रिभुजांचा पॅटर्न की कोळी? तज्ज्ञांनी ती समस्या रेकॉर्ड केली ज्यामध्ये व्यक्ती फोटो पाहतात. 
घाबरणाऱ्या लोकांनी सामान्य लोकांच्या तुलनेमध्ये कोळ्याचा फोटो जवळपास दोन वेळा पाहिला. घाबरणाऱ्या लोकांनी हा फोटो 4 सेकंदांसाठी पाहिला आणि इतर लोकांनी फक्त दोन सेकंदांसाठी पाहिला. 

तुम्हाला काय वाटतं असंही शक्य आहे का? या लोकांनी दोन फोटों पाहिले पण सांगताना मात्र त्यांनी फक्त कोळ्याचाच उच्चार केला? 

संशोधक या गोष्टीशी सहमत नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी खरं जाणून घेण्यासाठी कंट्रोल टेस्ट केली आणि त्यामध्ये असं आढळून आलं की, जर घाबरणारी एखादी व्यक्ती सांगत आहे की त्यांनी कोळी पाहिला तर तो तेच सांगत आहे जे त्याने पाहिलं. 

त्यानंतर प्रश्न असा उपस्थित होतो की, टेस्टमध्ये सहभागी व्यक्तीने मुद्दाम कोळी पाहिला. तज्ज्ञ या गोष्टीलाही दुजोरा देत नाहीत. त्यांनी सांगितलं की, 'हे शक्य नाही की, कोळ्याला घाबरणारी व्यक्ती उगाचच बराच वेळ त्याचा सामना करेल.' त्यांनी सांगितलं की, हे सर्व मेंदूवर अवलंबून असतं की, त्याला काय पाहायचं आहे.

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं.)

Web Title: Here are the reasons why are we afraid of spiders?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.