कोलेस्ट्रॉल वाढले हे कसे कळते ? दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:02 AM2022-11-04T11:02:41+5:302022-11-04T11:07:40+5:30
कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते.
उच्च कोलेस्ट्रॉल ही सध्या गंभीर समस्या बनत चालली आहे. कोलेस्ट्रॉल म्हणजे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांना सुरळीत रक्तप्रवाह करण्यास अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे वाढत्या कोलेस्ट्रॉलकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. सामान्यतः योग्य आहार आणि व्यायामाच्या मदतीने कोलेस्ट्रॉल कमी करता येऊ शकते. मात्र सध्या जंक फूड खाणे आणि व्यायामाचा अभाव अशीच अनेकांची जीवनशैली दिसून येते. परिणामी आहारात पोषक तत्वांची कमतरता भासते.
या लक्षणांकडे कधीही करु नका दुर्लक्ष
अस्वस्थता किंवा बैचेनी वाढणे
सतत थकवा जाणवणे
छातीत दुखणे
श्वास घेण्यास त्रास होणे
हात पाय सुन्न होणे
उच्च रक्तदाब
वाईट कोलेस्टेरॉल जमा होण्याचे कारण
पॅकबंद वस्तूंचे जास्त सेवन करणे.
कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि लठ्ठपणा अशा लोकांना देखील कोलेस्ट्रॉलचा धोका निर्माण होऊ असू शकतो.
जे लोक धूम्रपान करतात आणि मद्यपान करतात त्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.
कोलेस्ट्रॉलवर घरगुती रामबाण उपाय
लिंबू
लिंबाचा रस नियमित प्यायल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. लिंबात लॅक्टिक अॅसिड असते जे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत ठेवण्यास मदत करते. लिंबात असलेल्या आम्ल गुणधर्माचा शरिराला फायदा होतो.
मेथी
आयुर्वेदात मेथी खाण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. मेथीचे दाणे त्यांच्या औषधी गुणधर्मासाठी अनेक वर्षांपासून वापरले जात आहेत. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते आणि त्यात मधुमेहविरोधी, अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात.
कांद्याचा रस
कांद्याचा रस केवळ कोलेस्ट्रॉलचा धोका कमी करत नाही तर रक्त शुद्ध करुन हृदयाचं आरोग्यही चांगलं ठेवते.