जिभेवर काळे डाग आहेत? या उपायांनी करा दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 11:20 AM2018-08-15T11:20:03+5:302018-08-15T11:20:57+5:30
पचनक्रिया सुरळीत नसल्याने ही समस्या अनेकांना होते. तसेच याचं कारण असंही सांगितलं जातं की, शरीराला रक्ताच्या माध्यमातून पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. अशात जिभेची काळझी घेणे महत्वाचे ठरते.
(Image Credit : www.healthline.com)
शरीराच्या इतर अंगांप्रमाणे जीभ हे सुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तितकीच जिभेची घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्याने ही समस्या अनेकांना होते. तसेच याचं कारण असंही सांगितलं जातं की, शरीराला रक्ताच्या माध्यमातून पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. अशात जिभेची काळझी घेणे महत्वाचे ठरते.
कडूलिंबाची पाने
आयुर्वेदातही कडूलिंबाला वेगवेगळ्या आजारांवर रामबाण उपाय मानले आहे. कडूलिंब हा बॅक्टेरिअल इन्फेक्शन दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय मानला जातो. अशात काही कडूलिंबाची पाने पाण्यात उकळून त्या पाण्याने गुरळा केल्यास जिभेवरील डार दूर होण्यास मदत होऊ शकते. तसेच याने तोंडातील किटाणूही नष्ट होतात.
अननसही फायदेशीर
अननस हे फळ जितकं खाण्यासाठी चांगलं लागतं तितके त्याचे आरोग्यसाठीही फायदे आहेत. अननसामध्ये ब्रोमलेन एंजाइम असतं, ज्याने तुमच्या जिभेवरील काळे डाग दूर होतील. तसेच जिभेवरील डेड स्कीन सेल्सही दूर होतील.
आलंही फायदेशीर
आल्याचे तुकडे काही वेळ जिभेवर ज्या ठिकाणी काळे डाग आहेत तिथे ठेवा. हा उपाय काही दिवस करा. याने काळे डाग दूर होतील.
दालचिनी आणि लवंग
वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरली जाणारी दालचिनी आणि लवंगची या समस्येवर चांगला उपाय आहे. दालचिनीचे काही तुकडे आणि ४ लवंग घ्या. हे पाण्यात उकळून पाणी थंड होऊ द्या. या पाण्याने गुरळा करा. काळे डाग दूर होतील.
कोरफड
कोरफड वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी मानली जाते. जिभेवरील डाग घालवण्यासाठीही कोरफडीचा वापर होतो. कोरफडीचं जेल त्या डागांवर लावा किंवा कोरफडीच्या ज्यूसचं सेवन करा याने डाग दूर होतील.
(टिप - हे उपाय करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण वरील पदार्थ हे सगळ्यांसाठीच गुणकारी ठरतील असे नाही. कारण काहींना यांची अॅलर्जीही असू शकते.)