बापरे! जीभ काळीही पडू शकते? तुमची जीभ सांगतीये तुमचा आजार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:52 PM2022-11-05T14:52:44+5:302022-11-05T14:54:29+5:30
आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आधी जीभ दाखवा म्हणतात. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल की जीभ बघून असे काय निदान होते.
आजारी पडल्यावर आपण दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर आधी जीभ दाखवा म्हणतात. तुम्हाला कधीतरी प्रश्न पडलाच असेल की जीभ बघून असे काय निदान होते. तर अनेकदा जीभेच्या रंगावरुन आजार काय हे ओळखता येते. त्यामुळे डॉक्टर सुरुवातीलाच तोंड उघडून जीभ दाखवा असं सांगतात. तुम्हाला माहितीये का आपल्या जीभेचा रंग बऱ्याच वेळा बदलत असतो. काही गंभीर आजार झआल्यास जीभ काळी ही पडते. आता हे प्रत्येकालाच होते असे नाही. मात्र जीभेवरुन आजाराचा अंदाज लावता येतो.
पिवळी जीभ
जीभेचा रंग पिवळा पडत असेल तर आहारातून पौष्टिक तत्वे मिळत नाही हे समजुन घ्या. तसेच आतड्यांमध्ये किंवा पोटासंबंधीचे विकार असतील तरी जीभ पिवळी पडते.
निळी किंवा जांभळी जीभ
जीभेचा रंग नीळा झाला तर हे हृदयासंबंधित आजाराचे संकेत आहेत. अशावेळी हृदयापर्यंत रक्तपुरवठा होण्यास अडचण येते. अनेकदा रक्तात ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाले तरी जीभ जांभळी होऊ शकते.
चॉकलेटी जीभ
सिगरेट किंवा बिडीचे अतिसेवन चॉकलेटी जीभेला कारणीभूत ठरु शकते. तसेच चहा, कॉफी पिण्याचे प्रमाण जास्त असेल तरीही तुमच्या जीभेचा रंग बदलू शकतो.
लाल जीभ
जर तुमच्या जीभेचा रंग लाल भडक किंवा गुलाबी झाला असेल तर याचा अर्थ शरिरात व्हिटॅमिन बी१२ आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण घटले आहे. यामुळे जीभेवर लाल चट्टे दिसू लागतात.
पांढरी जीभ
पांढऱ्या जीभेचा अर्थ होतो की तुम्ही तोंड स्वच्छ धुऊन घेत नाही. यामुळे घाणीचा थर जीभेवर जमण्यास सुरुवात होते आणि जीभेचा रंग बदलत जातो. बऱ्याचदा साथीच्या रोगात जीभ पांढरी होते.
काळी जीभ
काळी जीभ म्हणजे गंभीर आजाराचा इशारा आहे. फंगल इन्फेक्शन आणि अल्सर असल्यासही जीभ काळी पडते. कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा इशाराही काळी जीभ देते.