कांद्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 02:29 PM2018-04-19T14:29:46+5:302018-04-19T14:29:46+5:30

कांद्याचा उपयोग वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव चांगली करण्यासोबतच इतरही अनेक फायदे आहेत. गरमीच्या दिवसात कांदा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो.

Here's a quick look at the incredible onion benefits for health | कांद्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

कांद्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहे का?

कांद्याचा वापर भारतीय किचनमध्ये कच्च्या आणि पक्क्या या दोन स्वरूपात केला जातो. या कांद्याचा उपयोग वेगवेगळ्या खाद्य पदार्थांची चव चांगली करण्यासोबतच इतरही अनेक फायदे आहेत. गरमीच्या दिवसात कांदा खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो. कांद्यात व्हिटामिन सी, लोह, गंधक, तांबे यांसारखे बहुमूल्य खनिज आहेत. ज्यामुळे शरिरातील शक्ती वाढते. चला जाणून घेऊया कांद्याचे इतरही असे काही फायदे जे कदाचित तुम्हाला माहिती नसतील.

* जर एखादा कि़टक किंवा किडा तुमच्या शरिरावर चावला असेल तर त्यावर लगेच कांदा कापून लावा. याने तुम्हाला लवकर आराम मिळेल.

* कांदा हा थंड असल्याने जर तुमच्या हातावर जळहळ होत असेल, तर त्या जागेवर कांदा लावा. लगेच त्याचा फायदा बघायला मिळेल.

* कांद्याचा रस कानावर आणि छातीवर लावल्यास उन लागत नाही. असे केल्यास उष्माघातापासून तुमचा बचाव होऊ शकतो. यासोबत उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याचेही अनेक फायदे आहेत. 

* अर्धा कप पांढ-या कांद्याच्या रसात गूळ आणि हळद मिक्स करून प्यायल्यास काविळापासून आराम आराम मिळू शकतो. लहान कांदा साफ करून चौकोनी आकारात कापा आणि ते लिंबूच्या रसात भिजवा. त्यावर मिठ किंवा काळं मिठ टाका. काविळावर हा चांगला उपाय मानला जातो. 

* जर तुम्हाला कुत्र्याने चावले असेल तर त्या जखमेवर कापलेला कांदा मधात मिक्स करून लावा. त्याने विषाचा प्रभाव कमी होतो.

* कांद्याच्या रसात मध मिक्स करून चाटण तयार त्याने दम्याचा त्रास कमी होतो. यासोबतच खोकल्यासाठीही या उपाय चांगला मानला जातो.

* मुलांना अतिसार झाल्यास कांदा बारीक करून त्यांच्या बेंबीवर लावा किंवा कपड्यात बांधून पोटावर लावा.
 

Web Title: Here's a quick look at the incredible onion benefits for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.