कशामुळे होतो नागीण आजार? जाणून कारणे आणि लक्षणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 11:23 AM2018-10-24T11:23:19+5:302018-10-24T11:23:40+5:30
नागीण हा आजार कुणाला झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा त्याबाबत नक्कीच ऐकलं असेल. हा आजार झाल्यास त्वचेवर बारीक बारीक पुरळ निघतात.
नागीण हा आजार कुणाला झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा त्याबाबत नक्कीच ऐकलं असेल. हा आजार झाल्यास त्वचेवर बारीक बारीक पुरळ निघतात. यात रुग्णाच्या शरीराच्या एका भागात एकाच जागी लाल पुरळ येतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ४० दिवसांनंतर या पुरळ अधिक येऊ लागतात. यात असह्या अशा वेदना होतात.
संसर्गजन्य आजार
ही गंभीर समस्या चिकन पॉक्स म्हणजे काजण्याचा वायरस वेरिसेला जोस्टर वायरसमुळे होते. शरीराच्या एका भागावर पुरळचे चट्टे आल्याने रुग्णाला वेदनाही होतात आणि तापही येतो. ही एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज जास्त आहे.
कुणाला होतो हा आजार?
सामान्यत: हा आजार त्या व्यक्तींना होतो ज्यांना काजण्या झाल्या असतील. काजण्या झाल्यावर त्यातील वेरिसेला झोस्टर हा वायरस आधीच शरीरात असेल तर तुम्हाला हा नागीण आजार होऊ शकतो. चिकन पॉक्स झाल्यावर हा वायरस नर्वस सिस्टीममध्ये जातो. अनेक वर्ष तो तिथे तसाच शांत पडून असतो.
का होतो हा आजार?
हा आजार का डोकं वर काढतो, याचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाहीये. असे मानले जाते की, जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रितकारक शक्ती कमी होते तेव्हा हा वायरस नर्वस सिस्टीममधून बाहेर येऊन सक्रिय होतो आणि आपल्या त्वचेपर्यंत पोहोचतो. वाढत्या वयासोबत याचा धोकाही अधिक वाढतो.
हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते.
हा आजार झाल्यावर व्यक्तीच्या शरीरावर लाल पुरळ येते. त्यामुळे त्याला वेदना सुरु होतात. पुरळींमध्ये वेदना होणे या आजाराचं सर्वात प्रमुख कारण आहे. हा आजार झाल्यास डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा आणि ताप इत्यादीही समस्या होतात.
किती दिवसात बरा होतो आजार?
हा आजार बरा करण्यासाठी अॅंटी वायरस मेडिसिन एसायक्लोविर दिलं जातं. जेणेकरुन शरीरातील वायरस नष्ट व्हावे. त्यासोबतच फॅमसायक्लोविर आणि वॅलासायक्लोविर ही औषधही दिली जातात. हा आजार बरा होण्यासाठी १० ते २० दिवसांचा कालावधी लागतो.