दिलासादायक! कोविड19 च्या उपचारांसाठी औषधाच्या ६० हजार बॉटल्स भारतात दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:21 PM2020-07-15T18:21:58+5:302020-07-15T18:30:18+5:30

CoronaVirus News & Latest Updates : महाराष्ट्रात हे औषध जास्त प्रमाणात पुरवले जाणार आहे.

Hetero healthcare supply 60000 vials of generic version of remdesvir in india | दिलासादायक! कोविड19 च्या उपचारांसाठी औषधाच्या ६० हजार बॉटल्स भारतात दाखल होणार

दिलासादायक! कोविड19 च्या उपचारांसाठी औषधाच्या ६० हजार बॉटल्स भारतात दाखल होणार

googlenewsNext

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर  कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे.  भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी जगभारातील अनेक देशात औषधाचा अभाव आहे. औषध उपलब्ध असली तरी काही प्रमाणात कमतरता भासत आहे. 

कोविड19 च्या रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडीसीविर या औषधांची सध्या कमतरता भासत आहे. त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  Remdesivir  भारतात Covifor औषधांच्या तब्बल  साठ हजार बॉटल्स निर्यात करणार आहे. त्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. २०  जुलैपर्यंत हे औषध भारतात दाखल होणार आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी या इंजेक्शनचा उपयोग केला जातो. या औषधाच्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यामुळे मागणी वाढली आहे. 

कोरोना: भारत में सस्ते में बनेगी रेमडेसिविर, बस इतनी होगी कीमत

महाराष्ट्रात जास्तीत जास्त  कोरोना रुग्ण संख्या असल्यामुळे महाराष्ट्रात हे औषध जास्त प्रमाणात पुरवले जाणार आहे. ६० हजारांपैकी महाराष्ट्रात  १२ हजार पाचशे औषधाच्या बॉटल्स मिळणार आहेत. त्यानंतर दिल्लीला १० हजार आणि तेलंगणा राज्याला ९ हजार इंजेक्शन देण्यात येणार आहेत. रुग्णांवर या औषधांचा वापर केल्याने रिकव्हरी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.  त्यामुळेच या औषधाची मागणी वाढली आहे.

दरम्यान अमेरिकेतील मॉर्डना इंक या कंपनीने लसीचा यशस्वी टप्पा पार केला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आता लसीची मोठ्या स्तरावर चाचणी केली जाणार आहे.  ही माहिती यूयॉर्क टाईम्सकडून प्रकाशित करण्यात आली आहे. या कंपनीच्या ट्रायलशी जोडलेल्या काही गोष्टी clinicaltrials.gov वर नमुद करण्यात आल्या आहेत. हे संशोधन २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे.

नॅशनल इंस्टिट्यूट्स ऑफ हेल्थ आणि मॉर्डना इंकमधील डॉ. फाउची यांनी ही लस विकसित केली आहे. दरम्यान मॉर्डना इंक या कंपनीचे शेअर्स १५ टक्क्यांनी वाढले आहेत. यानंतरच्या मानवी परिक्षणात फक्त तरूणांनाच नाही तर वयस्कर लोकांनाही सामिल करून घेतलं जाणार आहे. 

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

Web Title: Hetero healthcare supply 60000 vials of generic version of remdesvir in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.