High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:23 PM2021-02-24T13:23:01+5:302021-02-24T13:25:45+5:30

Health Care : हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनचं कनेक्शन आर्टिरिअल्स नावाच्या धमण्यांशी असतो. आर्टिरिअल्स आपल्या शरीरात ब्लड फ्लो रेग्युलेट करण्याचं काम करतात.

High Blood Pressure: Facial flushing and blood spots in eyes are two lesser known warning sign | High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!

High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!

googlenewsNext

हाय ब्लड प्रेशरची (High Blood Pressure) समस्या माणसाला हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जाते. त्यामुळेच या आजाराला सायलेंट किलर मानलं जातं. हाय ब्लड प्रेशरच्या लक्षणांबाबत काही लोकांना चांगलंच माहीत असतं. पण अशीही काही लक्षणे आहेत ज्याबाबत अनेकांना माहीत नसतं. व्यक्तीचा चेहरा बघूनही हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे की नाही हे जाणून घेता येतं.

हाय ब्लड प्रेशर म्हणजे हायपरटेंशनचं कनेक्शन आर्टिरिअल्स नावाच्या धमण्यांशी असतो. आर्टिरिअल्स आपल्या शरीरात ब्लड फ्लो रेग्युलेट करण्याचं काम करतात. जेव्हा या धमण्या पातळ होतात, माणसाचं हृदय रक्त खेचण्यासाठी अधिक मेहनत घेतं. सोबत नसांवरीलही प्रेशर वाढतं. (हे पण वाचा : मास्क लावल्यानंतर डोकेदुखी अन् अस्वस्थ वाटतंय? अशावेळी करायचं तरी काय, तज्ज्ञांनी सांगितले उपाय)

WebMD च्या एका रिपोर्टनुसार, डोकं गरगरणं, घाबरल्यासारखं वाटणं, घाम येणं आणि झोप न येणं हाय ब्लड प्रेशरची लक्षणे असू शकतात. पण ही लक्षणे इतकी कॉमन आहेत की, याची दुसरी वेगळी कारणेही असू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, डोळ्यातील ब्लड स्पॉट ज्याला सब्सकंजक्टिवल हॅमरेज म्हटलं जातं. तो हाय ब्लड प्रेशरचा वॉर्निंग साइन असू शकतो. 

एक्सपर्ट सांगतात की, डोळ्यात ब्लड स्पॉट डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरमधील मोठं कॉमन लक्षण आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, चेहऱ्यावर लालसरपणा दिसणे याचाही हाय ब्लड प्रेशरसोबत थेट कनेक्शन असू शकतं. फेस फ्लशिंगची ही समस्या तेव्हा होते जेव्हा चेहऱ्याच्या रक्तवाहिका पातळ होतात. सूर्याच्या संपर्कात आल्याने, थंडीमुळे, तिखट पदार्थ खाल्ल्याने, हवा, गरम पेय किंवा स्कीन केअर प्रॉडक्ट हे ट्रिगर होऊ शकतं. (हे पण वाचा : पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान)

त्यासोबतच इमोशनल स्ट्रेस, हीट किंवा गरम पाण्यासोबत संपर्क, दारूचं अधिक सेवन आणि ब्लड प्रेशर वाढवणारी एक्सरसाइज फेशिअल फ्लशिंगला वाढवू शकते. फेशिअल फ्लशिंगची ही समस्या शरीराचं ब्लड प्रेशर सामान्यापेक्षा जास्त झाल्यावर होते.

ब्लड प्रेशरबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे भ्रम आहेत आणि योग्य माहिती नसल्याने लोक ब्लड प्रेशर योग्य ठेवण्यासाठी योग्य पावले उचलू शकत नाहीत. ब्लड प्रेशरबाबत सामान्यपणे काही गैरसमज चांगलेच महागात पडू शकतात. प्रमाणापेक्षा जास्त मीठ ब्लड प्रेशर आणि किडनी दोन्हींसाठी खराब असतं. मीठ कमी सेवन करून ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं. पण जर तुम्हाला वाटत असेल की, केवळ मिठाचं सेवन कमी करून ब्लड प्रेशर कमी केलं जाऊ शकतं. तर तुम्ही चुकताय. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य लाइफस्टाइल ठेवणंही गरजेचं आहे.

Web Title: High Blood Pressure: Facial flushing and blood spots in eyes are two lesser known warning sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.