High BP: आरोग्यासाठी घातक आहे हाय ब्लड प्रेशर, बचावासाठी नियमित खा हे तीन फळं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 12:02 PM2022-12-10T12:02:04+5:302022-12-10T12:02:13+5:30

Fruits For High Blood Pressure : सॉल्टी फूड्समध्ये सोडिअम जास्त असतं. ज्यामुळे ही समस्या होते. त्याशिवाय जे लोक ऑयली आणि प्रॉसेस्ड फूडचं अधिक सेवन करतात त्यांच्या धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. यामुळे ब्लॉकेज होतात आणि ब्लड फ्लोमध्ये समस्या येते.

High blood pressure : Fruits for high blood pressure BP control tips | High BP: आरोग्यासाठी घातक आहे हाय ब्लड प्रेशर, बचावासाठी नियमित खा हे तीन फळं

High BP: आरोग्यासाठी घातक आहे हाय ब्लड प्रेशर, बचावासाठी नियमित खा हे तीन फळं

googlenewsNext

Fruits For High Blood Pressure : भारतात हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांची संख्या फार जास्त आहे. कारण इथे लोक जास्त मीठ असलेले पदार्थ खातात. सॉल्टी फूड्समध्ये सोडिअम जास्त असतं. ज्यामुळे ही समस्या होते. त्याशिवाय जे लोक ऑयली आणि प्रॉसेस्ड फूडचं अधिक सेवन करतात त्यांच्या धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. यामुळे ब्लॉकेज होतात आणि ब्लड फ्लोमध्ये समस्या येते. अशात रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी बराच जोर लावावा लागतो. यालाच हाय बीपी नावाने ओळखलं जातं.

ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे फळ

जेव्हा ब्लड प्रेशर वाढतं हृदयरोग सुरू होतात. यात हार्ट अटॅ्क, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीज यांचा समावेश असतो. सामान्यपणे जेव्हा तुम्ही स्ट्रेस किंवा टेंशनमध्ये असता. त्यावेळीही हाइपरटेंशनची समस्या होऊ शकते. अशात लोकांना रागही जास्त येतो. अशात चला जाणून घेऊ कोणती तीन फळं आहेत जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतात.

केळी

हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी केळी नक्की खावी. हे एक कॉमन आणि चांगलं फळ आहे. हे एक कॉमन फळ आहे जे लोकांना नेहमीच आवडतं. या फळांमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. जे हायपरटेंशनची समस्या दूर करण्यास मदत करतं.

संत्री

संत्र लोक नेहमीच इम्यूनिटी बूस्ट करण्यासाठी खातात. कारण यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पण हे एक आंबट फळ आहे. ज्यात सिट्रस अॅसिड असतं आणि याने ब्लड प्रेशर कमी केलं जाऊ शकतं.

सफरचंद

सफरचंद एक फारच फायदेशीर फळ आहे. हे तुम्ही नेहमीच ऐकत असाल. रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही. यात अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. सोबतच ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी हे फळं औषधासारखं आहे.

Web Title: High blood pressure : Fruits for high blood pressure BP control tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.