सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? वेळीच व्हा सावध, असू शकतो हा गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 10:03 AM2023-02-15T10:03:58+5:302023-02-15T10:04:24+5:30

High Blood Sugar Symptoms :जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीरात काही खास संकेत देऊ लागतं. अशात स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो.

High blood sugar symptoms diabetes control remedies | सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? वेळीच व्हा सावध, असू शकतो हा गंभीर आजार

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? वेळीच व्हा सावध, असू शकतो हा गंभीर आजार

googlenewsNext

High Blood Sugar Symptoms : आजकाल बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेक आजार सहजपणे होणं कॉमन झालं आहे. या आजारांबाबत आपण केवळ पुस्तकांमध्ये वाचतो. असाच एक आजार आहे ब्लड शुगर म्हणजे डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हाइपरग्लाइकेमिया (Hyperglycaemia) म्हणतात. ही स्थिती आरोग्यासाठी फार घातक असते. याची पुढची स्टेज हार्ट अटॅक असते. ज्यात व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

डॉक्टरांनुसार, जेव्हा शरीरात ब्लड शुगर हाय होऊ लागते तेव्हा शरीरात काही खास संकेत देऊ लागतं. अशात स्थितीत व्यक्तीचा घसा पुन्हा पुन्हा कोरडा पडू लागतो. त्यासोबतच पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याचीही इच्छा होते. स्किन इन्फेक्शन, धुसर दिसणे, ब्लॅडर इन्फेक्शन होणे, अचानक वजन कमी होणे, हे सगळे या गोष्टीचे संकेत आहेत की, तुमच्या ब्लडमध्ये शुगर हाय लेव्हल होत आहे. जी तुम्हाला कंट्रोल करण्याची गरज आहे.

डायबिटीस वाढण्याची कारणं

मेडिकल एक्सपर्ट सांगतात की, ब्लड शुगर हाय होणं कुणासाठीही जीवघेणं ठरू शकतं. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणंच चांगलं ठरतं. शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढण्याच्या कारणांमध्ये डिहाइड्रेशन, शारीरिक व्यायामाची कमतरता, जास्त खाणं, मानसिक तणाव, डायबिटीसची औषधं घ्यायला विसरणं किंवा एखा जुना आजार यांचा समावेश आहे. 

ब्लड शुगर कंट्रोल करण्याच्या टिप्स

जर तुम्हाला शरीरात ब्लड शुगर हाय होताना दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. नेहमी सोबत डायबिटीस कंट्रोल करणारी औषधं ठेवा. जर रात्री तुमची शुगर वाढली आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कुणालातरी सोबत घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये जावे. 

Web Title: High blood sugar symptoms diabetes control remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.