High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरावर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅकचा वाढतो धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 06:28 PM2022-02-09T18:28:08+5:302022-02-09T18:43:35+5:30

High Cholesterol Symptoms : तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य आहे की नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही.

High Cholesterol : 3 symptoms found on the hands skin and eyes high cholesterol | High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरावर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅकचा वाढतो धोका

High Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलं तर शरीरावर दिसतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर हार्ट अटॅकचा वाढतो धोका

googlenewsNext

(Image Credit : Daily Express)

आजच्या काळात कोलेस्ट्रॉलची (High Cholesterol) समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. तेच काही असेही  आहेत ज्यांना माहीत नाही की, कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचा असतो. ज्याला एचडीएल आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल नावाने ओळखलं जातं. यांना गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल असंही म्हटलं जातं. यातील गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल असतो, जे शरीरात फार महत्वपूर्ण कार्य करतं जसे की, हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी चं निर्माण.  तर एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या धमण्यांमध्ये जमा होतो आणि हृदयासंबंधी समस्या निर्माण करू लागतो.

अशात हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य आहे की नाही. यासाठी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. कारण जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुमच्या डोळ्यावर, स्किनवर आणि हातांवर त्याचे संकेत दिसतात. जर वेळीच हे संकेत तुम्ही ओळखले आणि लाइफस्टाईलमध्ये बदल केला तर तुम्ही केवळ कोलेस्ट्रॉलच कमी करणार नाही तर स्वत:चा जीवही वाचवू शकता. चला जाणून घेऊया ते संकेत....

हात दुखणे

जर नेहमीच तुमचा हात दुखत असेल तर हा तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो. जेव्हा आपल्या धमण्यांमध्ये आतल्या बाजूस  प्लाक म्हणजे फॅट जमा होतं. हे फॅट फॅटयुक्त पदार्थ आणि कॅल्शिअमपासून तयार होतं. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. याकारणानेच एथेरोस्क्लेरोसिसारखी गंभीर स्थिती निर्माण होते. जर तुमचे हात नेहमीच दुखत असेल तर एकदा चेकअप नक्की करा.

स्किनवर निशाण

जर तुम्हाला तुमच्या स्किनवर म्हणजे त्वचेवर कोणत्याही प्रकारचा बदल दिसतोय. डोळ्याखालील स्किनवर ऑरेंज किंवा पिवळा रंग दिसतो? हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो. तुम्हीही कधी एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याखालील रंग बदलेला पाहिला असेल. त्यासोबतच मनगट आणि पायाचा खालच्या भागावर याप्रकारचा रंग किंवा लाइन्स दिसत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य ते उपाय करा.

डोळ्यावर कोलेस्ट्रॉलचे संकेत

जर तुम्हाला वाटलं असेल की, कोलेस्ट्रॉल वाढल्याने बरोबर दिसत नाही वगैरे तर असं अजिबात नाहीये. ज्या व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल अधिक असते त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या कॉर्नियाच्या बाहेरील बाजूवर आणि खाली निळ्या किंवा पांढऱ्या रंगाची आकृती दिसू लागते.

या स्थितीला Arcus Senilis म्हटलं जातं. सामान्यपणे जे लोक ४५ वय क्रॉस केलेले असतात त्यांच्यात ही समस्या जास्त दिसते. पण ज्या लोकांना ही समस्या दिसत असेल त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. जर तुम्हालाही असे काही संकेत दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

(टिप - वरील लेखातील सल्ले किंवा संकेत हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. जर तुम्हाला काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.)
 

Web Title: High Cholesterol : 3 symptoms found on the hands skin and eyes high cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.