High cholesterol: शरीराच्या या भागावरील त्वचा कोरडी झालीये का? समजून घ्या वाढलं आहे कोलेस्ट्रॉल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:36 AM2022-08-31T11:36:56+5:302022-08-31T11:37:41+5:30

High cholesterol: चुकीची लाइफस्टाईल, अधिक मद्यसेवन आणि फॅटी फूड्समुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते. तसे तर हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे कमीच दिसतात.

High cholesterol dry skin in this area could be a sign of high levels | High cholesterol: शरीराच्या या भागावरील त्वचा कोरडी झालीये का? समजून घ्या वाढलं आहे कोलेस्ट्रॉल

High cholesterol: शरीराच्या या भागावरील त्वचा कोरडी झालीये का? समजून घ्या वाढलं आहे कोलेस्ट्रॉल

Next

High cholesterol:  हाय कोलेस्ट्रॉलची समस्या सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात एक गुड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. गुड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फार फायदेशीर मानलं जातं. तर बॅड कोलेस्ट्रॉल फार नुकसानकारक असतं. आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने त्या आकुंचन पावतात. ज्यामुळे ब्लड फ्लो फार कमी होतो. ब्लड फ्लो कमी झाल्याने हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

चुकीची लाइफस्टाईल, अधिक मद्यसेवन आणि फॅटी फूड्समुळे हाय कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते. तसे तर हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे कमीच दिसतात. पण काही संकेत मिळतात, ज्यावरून हाय कोलेस्ट्रॉलचा अंदाज लावू शकतो.

हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येवर वेळीच उपचार केले नाही तर रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होऊ लागतं. प्लाक एक वॅक्ससारखा पदार्थ असतो. जो कोलेस्ट्रॉल आणि इतर गोष्टींपासून तयार होतो. प्लाक फार जास्त जमा झाल्याने रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. ज्यामुळे याची लक्षणे पायांमध्ये दिसून येतात. पायांपर्यंत ब्लड फ्लो योग्यप्रकारे होत नसल्याने स्थितीला क्रिटीकल लिम्ब इस्केमिया म्हटलं जातं. यामुळे असह्य वेदना,  अल्सर किंवा जखमांचा धोका वाढतो.

NHS नुसार, क्रिटीकल लिम्ब इस्केमिया फारच धोकादायक असतो आणि याला बरं करणंही फार अवघड आहे. क्रिटीकल लिम्ब इस्केमिया झाल्यावर शरीरावर काही संकेत दिसणं सुरू होतात. या आजाराचा मुख्य संकेत म्हणजे पायांची त्वचा ड्राय होते.

मात्र, कोलेस्ट्रॉलशिवायही त्वचा ड्राय होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. पण क्रिटीकल लिम्ब इस्केमिया झाल्यावर त्वचेसोबत इतरही काही संकेत दिसू लागतात. क्रिटीकल लिम्ब इस्केमिया झाल्यावर त्वचा पिवळी पडणे, स्मूद आणि शायनी दिसते.

काय आहेत इतर लक्षणे

पायांमध्ये वेदना, रेस्टिंग पोजीशनमध्ये बसल्यावरही वेदना होणे.

पायाची त्वचा पिवळी पडणे, शायनी आणि स्मूद व ड्राय दिसणे.

पायांवर जखम किंवा अल्सर तयार होणे आणि वेळीच बरं न होणे.

पायांवरील मसल्स कमी होणे.

पायांची बोटे थंड किंवा सुन्न होणे, सोबतच लाल किंवा काळे दिसणं.

पायांच्या बोटांवर सूज आणि जखमा होणे.

जर तुम्हाला पायांवर हे संकेत दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा.
 

Web Title: High cholesterol dry skin in this area could be a sign of high levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.