चिंताजनक! कोलेस्ट्रॉल वाढलं तर कधीही येऊ शकतो हार्ट अटॅक; 'असं' करा कंट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:08 PM2024-08-01T15:08:14+5:302024-08-01T15:09:17+5:30
निरोगी हृदयासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करणं सोपं नाही.
हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करण्याचं काम करतो. निरोगी हृदयासाठी शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल करणं सोपं नाही.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने कधीही हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. यामुळे हृदयासंबंधित इतरही आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून कोलेस्ट्रॉलची लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवता येते.
असं करा कोलेस्ट्रॉल कंट्रोल
आहारात फायबरचा समावेश करा
कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुमच्या आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे ब्लडस्ट्रीममध्ये कोलेस्ट्रॉलचं अब्जॉर्प्शन कमी करण्यास मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या आहारात राजमा, स्प्राउट्स, सफरचंद यांचा समावेश करू शकता.
एनिमल फॅट टाळा
जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करायची असेल तर एनिमल फॅट टाळा. दूध, चीज, मलई आणि लोणी यांसारखे फॅटी डेअरी प्रोडक्ट्स देखील टाळा. या पदार्थांमध्ये प्रोसेस्ड फॅटसह कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते.
शाकाहारी पदार्थ खा
अधिकाधिक शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवता येतं. तसेच शरीराला उर्जा देखील मिळते.
वजन कमी करा
तुमचं वजन जास्त असेल किंवा लठ्ठ असेल तर ते लवकरात लवकर कमी करण्याचा प्रयत्न करा. वजन कमी केल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याच्या मदतीने लठ्ठपणामुळे होणारे इतर गंभीर आजारही टाळू शकतो.