High Cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल काही दिवसात होईल कमी, फक्त या तीन ज्यूसचं रोज करा सेवन...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 02:50 PM2022-12-01T14:50:36+5:302022-12-01T14:50:50+5:30
Juice For Bad Cholesterol: वेळीच सावध होण फार गरजेचं आहे. नाही तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेस्ल डिजीजसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
Juice For Bad Cholesterol: भारतच नाही तर जगभरातील लोक कोलेस्ट्रॉलच्या समस्येने हैराण झाले आहेत. आधी 40 वयानंतर ही समस्या जास्त होत होती. पण अलिकडे तर लहान मुलांपासून ते तरूणांना सुद्धा ही समस्या अधिक होत आहे. अशात वेळीच सावध होण फार गरजेचं आहे. नाही तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेस्ल डिजीजसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. पण अशात जर तुम्ही तीन प्रकारच्या ज्यूसचं सेवन केलं तर तुम्हाला शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळेल.
लौकी म्हणजेच दुधी भोपळ्याचा ज्यूस
दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे जी आरोग्यासाठी फार फायदेशीर मानली जाते. ही भाजी देशातील जवळपास सगळ्याच घरांमध्ये खाल्ली जाते. बऱ्याच लोकांनी ही भाजी खूप आवडते. काही लोक सांभारमध्ये मिक्स करून ही भाजी खाणं पसंत करतात. दुधी भोपळ्यात कॅलरी अजिबात नसतात. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही एक ग्लास याचा ज्यूस प्यायलात तर महिनाभरात तुमच्या रक्तात जमा झालेलं कोलेस्ट्रॉल कमी होईल.
बीटाचा ज्यूस
बीट हे एक असं हेल्दी फळ आहे जे जमिनीच्या आत उगवलं जातं आणि हे सामान्यपणे लोक सलादच्या रूपात खाणं पसंत करतात. पण रोज जर तुम्ही याचा ज्यूस काढून प्यायले तर रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळू शकते. बीटामध्ये व्हिटॅमिन बी आणि फॉस्फोरस भरपूर असतं. सोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी इन्फ्लामेट्री तत्व आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
कारल्याचा रस
कारलं हे चवीला कडू असतं. त्यामुळे फार कमी लोक याचं सेवन करतात. पण या भाजीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि फाइबर भरपूर असतं. तुम्ही जर रोज सकाळी एक ग्लास कारल्याचा रस सेवन केला तर तुमच्या अनेक समस्या लगेच दूर होतील.