High Cholesterol: शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची मुख्य कारणं? उशीर होण्याआधी फॉलो करा या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:40 AM2022-06-28T11:40:04+5:302022-06-28T11:40:16+5:30
High Cholesterol causes : अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? चला जाणून घेऊ याचं उत्तर.
High Cholesterol causes : शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं म्हणजे हार्ट अटॅकचा धोका वाढणं. अशात तुम्हाला खास काळजी घ्यावी लागेल, नाही तर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. या स्थितीतून वाचण्यासाठी तुम्हाला सर्वातआधी डाएटमध्ये बदल करावा लागेल. कारण काही लोकांना चुकीचं खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. ज्याच्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. अशात अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की, शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण काय आहे? चला जाणून घेऊ याचं उत्तर.
खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी?
सर्वातआधी तर तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही आहारात काय घेत आहात? कारण ज्याप्रकारचा आहार तुम्ही घ्याल शरीरावर त्याच प्रकारचा प्रभाव पडणार. जर तुम्ही जास्त प्रमाणात फॅट असलेले पदार्थ खात असाल तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात हे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. जास्तीत जास्त हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करा. याने तुम्हाला फायदा मिळेल.
लठ्ठपणा
तुम्हाला माहीत आहे का की, जेव्हा तुमचं वजन वाढतं तेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. अशात तुम्ही वजन वाढू देऊ नका. सतत एक्सरसाइज करा. जेणेकरून अशाप्रकारचे आजार तुम्हाला होऊ नये. वजन कमी करण्यासाठी आहार आणि एक्सरसाइज दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.
मद्यसेवन आणि धुम्रपान
जर तुम्ही मद्यसेवन करण्यासोबतच स्मोकिंगही करत असाल तर तुम्ही आरोग्यासोबत खेळ करत आहात. कारण सर्वांनाच माहीत आहे की, या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहेत. अशात या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. असं केलं नाही तर शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता दाट असते. ज्यामुळे तुम्हाला लवकर हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.
(टिप : वरील लेखातील टिप्स किंवा सल्ले हे सामान्य माहितीवर आधारित आहेत. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला काहीही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.)