हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 11:55 AM2022-07-29T11:55:41+5:302022-07-29T11:56:13+5:30

High Cholesterol : शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊ शकतं. जसजसं हे फॅट वाढतं तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लडचा फ्लो फार अवघड होतो.

High cholesterol painful sensations to watch out in your arms | हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं!

हातांमध्ये जाणवत असतील या दोन गोष्टी तर समजून घ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं!

googlenewsNext

शरीरात कोलेस्ट्रॉलचं (High Cholesterol) प्रमाण वाढल्यावर हार्ट डिजीजच्या समस्येचा सामना करावा लागतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका फार जास्त वाढतो. त्यासोबतच ग्लोबल हेल्थ एजन्सीने सांगितलं की, जगात एक तृतीयांश लोकांच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्यांना हृदयासंबंध रोगांचा सामना करावा लागतो. हाय कोलेस्ट्रॉल यामुळेही धोकादायक मानलं जातं  कारण याचे शरीरात कोणतेही लक्षण दिसत नाही. त्यामुळे याला सायलेंट किलर म्हटलं जातं. 

शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊ शकतं. जसजसं हे फॅट वाढतं तुमच्या आर्टरीजमध्ये ब्लडचा फ्लो फार अवघड होतो. कधी कधी जेव्हा फॅट तुटतं तेव्हा याचे ब्लड क्लॉट तयार होतात. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका जास्त वाढतो.एक्सपर्टचं मत आहे की, शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर कोणतेही संकेत दिसत नाही. पण शरीरात असे काही सेंसेशन होतात, ज्यामुळे तुम्हाला शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची माहिती मिळते.

हे फार गरजेचं आहे की, शरीरात कोलेस्ट्रॉलची एक संतुलित लेव्हल मेंटन ठेवावी. कारण याने आर्टरीजमध्ये फॅट जमा होऊ शकतं. ज्याने हात आणि पायांमध्ये ब्लडचा फ्लो कमी होतो. या स्थितीला पेरीफेर आर्टरी डिजीज म्हटलं जातं. ज्यामुळे तुमच्या पाय आणि हातांमध्ये जास्त वेदना होतात. 

मेयो क्लीनिकनुसार, जर तुम्हाला कोणतंही काम करताना हात आणि पायांमध्ये वेदना होत असतील तर हा या गोष्टीचा संकेत आहे की, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर तुम्हाला कोणतंही काम करताना वेदनेसोबत क्रॅम्पच्या समस्येचा सामना करावा लागतो. हाय-पायांमध्ये क्रॅम्स तेव्हा येतात जेव्हा तुमचं शरीर रेस्टिंग पोजिशनमध्ये असतं आणि तुम्ही अचानक एखादं काम करू लागता.

काय आहे पेरीफेरल आर्टरी डिजीज

पेरीफेरल आर्टरी डिजीज एक असा आजार आहे ज्यात तुमचं डोकं, ऑर्गन्स आणि पायांपर्यंत रक्त नेणाऱ्या आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. ही एक सामान्य सर्कुलेटरी समस्या आहे. ज्यात आर्टरीज फार जास्त पातळ असते ज्यामुळे पायांमध्ये आणि हातांमध्ये योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही. 

हातात होणाऱ्या वेदनांचा अर्थ फक्त कोलेस्ट्रॉल नाही

हातात होणाऱ्या वेदना फक्त हाय कोलेस्ट्रॉलमुळे होतात असं नाही. त्याची इतरही कारणे असू शकतात. हात आणि खांद्यामध्ये होणारी वेदना हार्ट अटॅक आणि एनजाइनाचा संकेत असतो. जे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. त्याशिवाय हातात होणाऱ्या वेदनांची इतरही कारणे असू शकतात जसे की, स्ट्रेन, जखम होणे.

या संकेतांवरही लक्ष द्या

पाय सुन्न होणे आणि कमजोरी जाणवणे

पायांचे केस गळणे

पायाच्या बोटांची नखे सहजपणे तुटणे आणि हळूहळू वाढणे

पायांसोबत तळपायांवर अल्सर

पायांच्या त्वचेचा रंग बदलणे, जसे की पिवळा किंवा निळा पडणे

पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन

का वाढतं कोलेस्ट्रॉल?

शरीरात अनहेल्दी कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. सॅच्युरेटेड फॅटयुक्त पदार्थांचं सेवन करणं, लठ्ठपणा, फिजिकल अॅक्टिविटी न करणे, स्मोकिंग आणि मद्यसेवन करणे यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
 

Web Title: High cholesterol painful sensations to watch out in your arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.