शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा हा संकेत दिसला तर वेळीच व्हा सावध, हार्ट अटॅकपासून करता येईल बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 11:22 AM2022-07-05T11:22:42+5:302022-07-05T11:23:13+5:30

High Cholesterol Sign : आपल्या शरीरात हेल्दी सेल्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, पण शरीरात याचं प्रमाण जास्त झालं हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. 

High cholesterol sign in body risk effects symptoms cramps in five areas of the body | शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा हा संकेत दिसला तर वेळीच व्हा सावध, हार्ट अटॅकपासून करता येईल बचाव

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याचा हा संकेत दिसला तर वेळीच व्हा सावध, हार्ट अटॅकपासून करता येईल बचाव

Next

High Cholesterol Sign : कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो लिव्हरमध्ये तयार होतो आणि शरीरात सगळीकडे पसरतो. आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळतात एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल आणि दुसरा म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या आर्टरीजमध्ये जमा होतं. ज्याने अनेक प्रकारचे आजार होऊ लागतात. आपल्या शरीरात हेल्दी सेल्स बनवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची गरज असते, पण शरीरात याचं प्रमाण जास्त झालं हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. 

शरीरात कोलेस्ट्रॉलची लेव्हल फॅटी फूड खाल्ल्याने, एक्सरसाइज न केल्याने, वजन वाढल्याने, स्मोकिंगने आणि मद्यसेवन केल्याने वाढते. अनेकदा हे जेनेटिकही असतं. शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याचे कोणतेही संकेत दिसत नाही. पण यामुळे अनेक आजार होऊ शकतात. आर्टरीजमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी क्रॅम्पची समस्या होऊ लागते. हा पेरिफेरल आर्टरी डिजीजचा संकेतही असू शकतो. जे कोलेस्ट्रॉल वाढल्याने होतं.

काय आहे पेरिफेरल आर्टरी डिजीज?

पेरिफेरल आर्टरी डिजीज एक असा आजार आहे ज्यात तुमच्या डोक्यात, ऑर्गन्स आणि पायांपर्यंत रक्त नेणाऱ्या आर्टिरीज म्हणजे धमण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं. ही एक सामान्य सर्कुलेटरी समस्या आहे. ज्यात आर्टरीज पातळ होतात ज्यामुळे पाय आणि हातांपर्यंत रक्त योग्यप्रमाणात पोहोचत नाही. 

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं

कॅलिफोर्निया विश्वविद्यालय सॅन फ्रान्सिकोच्या सर्जरी विभागानुसार, शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याची अनेक लक्षणं दिसतात. ज्यातील एक लक्षण म्हणजे क्रॅम्प. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर पाय, मांड्या, कंबर आणि पायाच्या पंज्यांमध्ये क्रॅम्पची समस्या येऊ लागते. ज्यामुळे पायांवरील जखमा हळूहळू किंवा अनेकदा अजिबातच ठीक होत नाहीत. यादरम्यान त्वचा पिवळी किंवा निळ्या रंगाची दिसू लागते. सोबतच एका पायाचं तापमान दुसऱ्या पायाच्या तुलनेत जास्त किंवा कमी होऊ शकतं. सोबतच नखं वाढण्याचा वेगही कमी होतो.

या सर्व लक्षणांशिवाय बऱ्याच लोकांमध्ये पेरिफेरल आर्टरी डिजीजची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. अशात तुम्हाला यातील कोणतीही लक्षणं दिसत असतील किंवा वेदना होत असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने शरीरावर होणारा परिणाम

हाय कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होऊ लागतं आणि नंतर फॅट वाढतं, ज्याने रक्तवाहिन्यात रक्ताचा फ्लो कमी होतो आणि नंतर फ्लो थांबतो. काही केसेसमध्ये फॅटचे तुकडे होतात आणि ब्लड फ्लो पूर्णपणे रोखतात, ज्याने हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढतो. अशाप्रकारे हाय कोलेस्ट्रॉल नर्वस सिस्टीम आणि हार्टला सर्वात जास्त प्रभावित करतं.

काय आहे उपाय?

काही पदार्थ असे आहेत ज्यांचं सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी केलं जाऊ शकतं. यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही सॅच्युरेटेड फॅटऐवजी अनसॅच्युरेटेड फॅटचा डाएटमध्ये समावेश करा. ऑलिव ऑइल, सनफ्लॉवर ऑइल, नट्स आणि सीड्स ऑइलमध्ये हेल्दी फॅट असतं. त्यासोबतच रोज एक्सरसाइज करूनही तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता.

Web Title: High cholesterol sign in body risk effects symptoms cramps in five areas of the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.