High Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं तर चेहऱ्यावर दिसतात हे संकेत, वेळीच सावध व्हा नाही तर....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:31 PM2022-06-15T12:31:38+5:302022-06-15T12:32:05+5:30
High Cholesterol sing on face : कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीरावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय काय लक्षणं दिसतात.
High Cholesterol sing on face : जर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरात वाढलं तर काही आजार आयुष्यभर तुमचा पिच्छा सोडत नाहीत. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं तर हार्ट अटॅकचा धोकाही सर्वात जास्त असतो. अशात शरीरावर याची काही लक्षणंही दिसतात. कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीरावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर काय काय लक्षणं दिसतात.
कोलेस्ट्रॉल वाढल्याने चेहऱ्यात होतो हा बदल
जेव्हा शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा तुमच्या चेहऱ्यामध्येही बदल होतो. यादरम्यान तुमची त्वचा पिवळी आणि ऑरेंज कलरची होऊ लागते. अशात तुम्ही याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. त्यासोबतच डोळ्यांवरही याचा प्रभाव दिसून येतो. डोळ्याच्या रंगात तुम्हाला बदल दिसून येईल.
का वाढतं कोलेस्ट्रॉल?
काही गोष्टी अशा असतात ज्या खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक वाढतं. अशात तुम्ही यापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करावे लागतील. हे केले नाही तर हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर दिसतात ही लक्षणं
- छातीत वेदना होणं हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण आहे. जर तुम्हाला ही समस्या पुन्हा पुन्हा होत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाही तर पुढे जाऊन मोठी समस्या होऊ शकते.
- लठ्ठपणाही हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येचं लक्षण आहे. जर तुमचं वजन सतत वाढत असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून नक्की सल्ला घ्या. सोबतच लाइफस्टाईलमध्येही बदल करा.
- जर तुमचे पाय दुखत असतील तर वेळीच सावध व्हा. कारण याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. हे हाय कोलेस्ट्रॉलचं लक्षण आहे. वेळीच डॉक्टरांना संपर्क करा आणि योग्य ते उपचार करा.