High cholesterol : बोटांमध्ये हे संकेत दिसत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हार्ट अटॅक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:30 AM2021-11-20T11:30:12+5:302021-11-20T11:31:08+5:30

High Cholesterol: हाय कोलेस्ट्रॉलकडे गंभीरतेने बघत नाहीत. याचं एक मोठं कारण म्हणजे या समस्येचे म्हणजे हाय कोलेस्ट्रॉलची काही खास लक्षणे दिसत नाहीत.

High cholesterol signs are visible in hands legs fingers it may cause of heart attack and stroke | High cholesterol : बोटांमध्ये हे संकेत दिसत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हार्ट अटॅक धोका

High cholesterol : बोटांमध्ये हे संकेत दिसत असतील तर वेळीच व्हा सावध, होऊ शकतो हार्ट अटॅक धोका

Next

हाय कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) मुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होतात. ही अलिकडे एक मोठी समस्या म्हणून समोर येत आहे. याने ब्लड वेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात आणि स्ट्रोक (Stroke)-हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. तरी सुद्धा अनेक लोक हाय कोलेस्ट्रॉलकडे गंभीरतेने बघत नाहीत. याचं एक मोठं कारण म्हणजे या समस्येचे म्हणजे हाय कोलेस्ट्रॉलची काही खास लक्षणे दिसत नाहीत.

काय आहे हाय कोलेस्ट्रॉलचं कारण

यूकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणं आणि पुरेसा व्यायाम न करणे म्हणजे शरीराची फार हालचाल होत नसेल तर हाय कोलेस्ट्रॉलची समस्या होते. त्यासोबतच जास्त बॉडी वेट, स्मोकिंग आणि अल्कोहोलचं सेवन हेही हाय कोलेस्ट्रॉलचं कारण आहे. हाय कोलेस्ट्रॉलची समस्या अनुवांशिकही असू शकते. पण हेल्दी डाएट आणि रोज एक्सरसाइज केल्याने याचा धोका कमी केला जाऊ शकतो.

घाम गाळणं गरजेचं

तज्ज्ञांनुसार, हाय कोलेस्ट्रॉलचा धोका टाळायचा असेल तर मॉडरेट एरबोकि अॅक्टिविटी गरजेची आहे. म्हणजे अशी एक्सरसाइज ज्याने तुमचा हार्ट रेट वाढेल आणि घामही निघेल. त्यासोबतच कमी फॅट असलेले पदार्थ खावेत. आपल्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करावा.

ही आहेत लक्षणे

हाय कोलस्ट्रॉलची तशी तर काही खास लक्षणे नाहीत. पण हात-पायांच्या बोटांमध्ये वेदना हे याचं एक लक्षण असू शकतं. त्यासोबतच बोटे सुन्न होणे हेही एक लक्षण आहे. बरं होईल की, तुमचं वय जर ३० ते ३५ असेल तर एकदा कोलेस्ट्रॉल लेव्हल चेक करा. अनेकदा कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असल्याने त्वचेत फॅट गाठीच्या रूपात जमा होतं. जे नेहमी हात, पाय आणि डोळ्यांजवळ दिसतं.
 

Web Title: High cholesterol signs are visible in hands legs fingers it may cause of heart attack and stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.