उच्च कोलेस्ट्रॉल आहे गंभीर, याची लक्षणं दिसतात पायवरही....कोणती? वेळीच घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:09 PM2022-05-12T18:09:03+5:302022-05-12T18:11:47+5:30

तुम्हाला ही बाब जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात, त्यामुळे काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष (High Cholesterol Symptoms in Legs) करू नये.

high cholesterol symptoms are seen in legs | उच्च कोलेस्ट्रॉल आहे गंभीर, याची लक्षणं दिसतात पायवरही....कोणती? वेळीच घ्या जाणून

उच्च कोलेस्ट्रॉल आहे गंभीर, याची लक्षणं दिसतात पायवरही....कोणती? वेळीच घ्या जाणून

googlenewsNext

वजन आणि पोटाच्या वाढत्या चरबीवरून आपण शरीरात कोलेस्ट्रॉलचा अंदाज घेतो. परंतु, वाढलेले कोलेस्ट्रॉल इतर अनेक मार्गांनी देखील शोधले जाऊ शकते. ही एक प्रकारची चरबी आहे, ज्यामध्ये यकृत त्याच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात तयार होणाऱ्या खराब कोलेस्ट्रॉलमुळे मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला ही बाब जाणून आश्चर्य वाटेल की, उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे पायातही दिसू शकतात, त्यामुळे काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष (High Cholesterol Symptoms in Legs) करू नये.

पायांमध्ये दिसणारी उच्च कोलेस्टेरॉलची लक्षणे कोणती?
1. थंड पाय -

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, हिवाळ्यात पाय थंड पडणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु कडक उन्हाळ्यातही असे होऊ लागले तर समजून घ्या की काहीतरी मोठं बिघडलेलं आहे. असं होणं हे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, त्वरित तपासणी करणे आवश्यक आहे.

2. पायांच्या त्वचेच्या रंगात बदल -
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे, पायांना रक्त पुरवठ्यावर देखील परिणाम होतो, ज्याचा प्रभाव पायांवर स्पष्टपणे दिसून येतो. रक्ताच्या कमतरतेमुळे, पायांच्या त्वचेचा आणि नखांचा रंग बदलू लागतो कारण रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि पोषक पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.

3. पायात पेटके येणे -
रात्री झोपताना अनेकांना पायात पेटके येतात, हे उच्च कोलेस्टेरॉलचे सामान्य लक्षण आहे. याचा अर्थ तुमच्या शरीराच्या खालच्या भागातील नसांना इजा होत आहे. पायाशिवाय तर्जनी, टाच किंवा पायाच्या बोटांमध्येही क्रॅम्प्स येतात, ज्याचा आपल्या झोपेवरही परिणाम होतो.

4. पाय दुखणे -
जेव्हा जास्त कोलेस्ट्रॉलमुळे पायांना रक्त पुरवठ्यात अडथळा येतो आणि तेथे ऑक्सिजन योग्यरित्या पोहोचत नाही, तेव्हा पायात तीव्र वेदना होतात. पायात जडपणा आणि थकवा जाणवतो. अशा स्थितीत, सामान्य चालणं देखील अवघड होतं.

Web Title: high cholesterol symptoms are seen in legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.