High Cholesterol : २५ ते ३५ वयात दिसत असतील ही लक्षणं तर असू शकतो High Cholesterol चा धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:02 AM2022-03-14T11:02:01+5:302022-03-14T11:03:07+5:30
जर २५ ते ३५ वयाच्या तरूणांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं (High Cholesterol symptoms) दिसत असतील तर सतर्क राहण्याची गरज आहे. ती काय लक्षणं असतात हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल आपल्या अनहेल्दी लाइफस्टाईमुळे आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयासंबंधी समस्या, मेंदूसंबंधी समस्या, डायबिटीस, कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोलेस्ट्रॉलबाबत. तरूणांना सुद्धा कोलेस्ट्रॉलची समस्या होऊ लागली आहे. तरूणांमध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं फार नुकसानकारक ठरू शकतं. अशात जर २५ ते ३५ वयाच्या तरूणांमध्ये वाढत्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं (High Cholesterol symptoms) दिसत असतील तर सतर्क राहण्याची गरज आहे. ती काय लक्षणं असतात हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
१) पायात थरथरी
जर व्यक्तीच्या पायांमध्ये थरथरी जाणवत असेल किंवा मुंगी चावल्यासारखं जाणवत असेल तर हे वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. असं तेव्हा होतं जेव्हा ऑक्सीजनयुक्त रक्त अवयवांमध्ये पोहोचू शकत नाही. त्यावेळी त्या अवयवयांमध्ये थरथरी जाणवू शकते.
२) अस्वस्थता आणि घाम
जेव्हा व्यक्तीला अस्वस्थता आणि घाम येत असेल तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. जेव्हा रक्त पुऱेशा प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि हृदय कमी रक्त पंप करू लागतं तेव्हा अस्वस्थता आणि घाम यासारख्या समस्या निर्माण होतात.
३) डोळ्यांवर पिवळे डाग
जर एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांवर पिवळे चट्टे दिसत असतील तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. असं तेव्हा होतं जेव्हा रक्तात फॅटचं प्रमाण वाढतं.
४) शरीरात वेदना
जेव्हा व्यक्तीची मान, जबडा, पोट आणि पाठ दुखत असेल तर हेही वाढत्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. याकडे दुर्लक्ष केलं तर पुढे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे लोक नेहमीच सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. पण यामुळे व्यक्तीला इतर आणखीही काही समस्यांचा सामना करावा लागतो. अशात वेळीच उपचार करणं गरजेचं असतं.