Cholesterol वाढल्यावर हातांवर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:03 PM2022-09-02T15:03:26+5:302022-09-02T15:03:42+5:30

Cholesterol Warning Sign in Hands: सॅच्युरेटेड फॅटमुळे रक्तात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. हाय कोलेस्ट्रॉलमुळे लठ्ठपणा, हाय बीपी, डायबिटीस आणि इतर हार्ट डिजीजसारख्या समस्या वाढू लागतात.

High Cholesterol symptoms warning sign in hands, you should know this | Cholesterol वाढल्यावर हातांवर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Cholesterol वाढल्यावर हातांवर दिसतात ही लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

googlenewsNext

Cholesterol Warning Sign in Hands: आधीच्या तुलनेत आजकाल लोकांच्या लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बराच बदल झाला आहे. ज्याचा प्रभाव त्यांच्या आरोग्यावर पडतो. आहारानुसार आपल्या आरोग्याचा स्तर ठरतो. पण बरेच लोक तेलकट किंवा बाहेरील पदार्थ खाणं पसंत करतात जे अनहेल्दी असतात. सॅच्युरेटेड फॅटमुळे रक्तात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. हाय कोलेस्ट्रॉलमुळे लठ्ठपणा, हाय बीपी, डायबिटीस आणि इतर हार्ट डिजीजसारख्या समस्या वाढू लागतात.

हाय कोलेस्ट्रॉलपासून वाचा

जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा यात ब्लॉकेज निर्माण होतात. अशात रक्त हार्टपर्यंत पोहोण्यात अनेक अडथळे येतात. जेव्हा रक्ताला पुढे जाण्यासाठी ब्लॉकेज सामना करताना जोर लागतो तेव्हा ब्लड प्रेशर वाढू लागतं आणि मग हार्ट अटॅक येऊ शकतो. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हाय कोलेस्ट्रॉलचा धोका वेळीच कसा ओळखावा.

कसे मिळणार कोलेस्ट्रॉल वाढल्याचे संकेत

हाय कोलेस्ट्रॉलची माहिती एका खासप्रकारच्या ब्लड टेस्टमधून लागते. ज्याला लिपिड प्रोफाइल टेस्ट म्हणतात. त्याशिवाय कोलेस्ट्रॉल वाढण्यादरम्यान आपल्या हातांवरही काही साइन दिसू लागतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे साइन...

1) हातांमध्ये वेदना

शरीरात जेव्हा प्लाक जमा होऊ लागतो तेव्हा ब्लड वेसेल्समध्ये ब्लॉकेज होतात. याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. जेव्हा ब्लॉकेज वाढतात तेव्हा हातातील रक्तप्रवाह हळूवार होतो किंवा बंद होतो. अशा स्थितीत हातांमध्ये वेदना होऊ लागतात. या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2) हातांमध्ये झिणझिण्या

जसे की, आधी सांगितलं, रक्तात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यावर ब्लड फ्लोमध्ये अडथळा येऊ लागतो. आणि जेव्हा रक्त आपल्या हातांपर्यंत योग्य प्रमाणात पोहोचू शकत नाही तेव्हा त्यामुळे हातांमध्ये झिणझिण्या येऊ लागतात.

3) नखांचा रंग पिवळा होणे

सामान्यपणे नखांचा रंग नैसर्गिकरित्या गुलाबी असतो. हा रंग असाच असेल तर त्यात रक्ताचं प्रमाण योग्य आहे असं समजलं जातं. पण कोलेस्ट्रॉल वाढलं की, ब्लॉकेज वाढतात आणि नखांपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नाही. अशात नखांचा रंग पिवळा होऊ लागतो. हे संकेत दिसले की, लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Web Title: High Cholesterol symptoms warning sign in hands, you should know this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.