डोळ्यांमध्ये दिसतात Cholesterol वाढल्याची ही 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 02:37 PM2022-08-16T14:37:20+5:302022-08-16T14:38:39+5:30

Cholesterol : कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने ब्लड फ्लो हळुवार होतो, ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. ब्लड फ्लो स्लो झाला तर हृदयासंबंधी रोगांचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

High cholesterol symptoms : You can see in your eyes eat canned beans to lower bad cholesterol | डोळ्यांमध्ये दिसतात Cholesterol वाढल्याची ही 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं!

डोळ्यांमध्ये दिसतात Cholesterol वाढल्याची ही 3 लक्षणं, दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं!

googlenewsNext

कोलेस्ट्रॉल (Cholesterol) लेव्हल वाढणं एक गंभीर समस्या बनू शकते. शरीराच्या क्रिया व्यवस्थित होण्यासाठी याची गरज असते. पण याचं प्रमाण वाढलं तर गंभीर नुकसान होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल एक मेणासारखा पदार्थ असतो. जे रक्तात असतं. अनेकदा हे रक्तात चिकटतं आणि रक्ताच्या नसांना ब्लॉक करतं.

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याने ब्लड फ्लो हळुवार होतो, ज्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते. ब्लड फ्लो स्लो झाला तर हृदयासंबंधी रोगांचा आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हृदयरोगसारख्या गंभीर समस्यांचा धोका कमी करण्यासाठी तुमचं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं असतं.

कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय असतात? शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुम्हाला अनेक प्रकारची लक्षणे जाणवू शकतात. जसे की, जास्त घाम येणे, थकवा जाणवणे, कमजोरी जाणवणे भूक न लागणे इत्यादी. त्याशिवाय इतरही काही लक्षणे आहेत जी तुमच्या डोळ्यांच्या आत किंवा आजूबाजूला दिसू शकतात.

डोळ्यात पिवळेपणा

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोळ्याशी संबंधित पहिलं लक्षण आहे xanthelasma. या स्थितीत डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळेपणा दिसू शकतो. हे डोळ्याखाली जमा कोलेस्ट्रॉलमुळे होतं. असं मानलं जातं की, ज्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल जास्त असते, त्यांच्यात ही स्थिती दिसते.

दूसरं लक्षण Arcus senilis

ही एक अशी स्थिती आहे ज्यात डोळ्याच्या समोरच्या भागात चारही बाजूने निळे, पांढरे आणि हलक्या भुरक्या रंगाचे चट्टे येऊ शकतात. ही स्थिती कॉर्नियाच्या वर किंवा खाली सुरू होऊ शकते. ही समस्या पुढे नंतर खूप वाढते.

तिसरं लक्षण Retinal vein occlusion

ही एक अशी स्थिती आहे ज्यात डोळांच्या रक्ताच्या नसांमध्ये ब्लॉकेज होऊ शकतं आणि याने अनेक गंभीर दृष्टीसंबंधी समस्या होऊ शकतात. या स्थितीकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. लक्षण दिसलं तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा बीन्स

2021 मध्ये जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स खाल्ल्यावर चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यास आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते. अभ्यासकांचं मत आहे की, कॅन बीन्स म्हणजे डब्यात बंद असलेले ब्लॅक, नेवी, पिंटो, डार्क रेड किडनी आणि व्हाइट किडनीसारखे बीन्स खाल्ल्याने फायदा मिळेल.

बीन्स खाल्ल्याने कसा मिळतो फायदा

वैज्ञानिकांनी सांगितलं की बीन्समध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि हेच कारण आहे की, याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.

Web Title: High cholesterol symptoms : You can see in your eyes eat canned beans to lower bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.