सतत हलकी-हलकी थंडी वाजत असेल तर असू शकतं 'हे' कारण, ६ लक्षणं दिसताच लगेच करा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:52 AM2024-09-14T11:52:18+5:302024-09-14T11:53:14+5:30

High kapha dosha symptoms : आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तन्मय गोस्वामी यांनी कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरात कोणती ६ लक्षणं दिसतात याबाबत सांगितलं आहे.

High kapha dosha symptoms and signs and habits to avoid immediately | सतत हलकी-हलकी थंडी वाजत असेल तर असू शकतं 'हे' कारण, ६ लक्षणं दिसताच लगेच करा उपाय!

सतत हलकी-हलकी थंडी वाजत असेल तर असू शकतं 'हे' कारण, ६ लक्षणं दिसताच लगेच करा उपाय!

High kapha dosha symptoms : आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, शरीरात तीन दोषांवर टिकून आहे. हे दोष शरीराच्या आरोग्याबाबत माहिती देतात. यांनुसारच व्यक्तीने खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलची निवड करावी. हे दोष वाढले तर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसतात. हे दोष नियंत्रित केल्याशिवाय शरीरातील वेगवेगळ्या समस्या दूर करता येत नाहीत. यातीलच एक दोष म्हणजे कफ दोष.

आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तन्मय गोस्वामी यांनी कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरात कोणती ६ लक्षणं दिसतात याबाबत सांगितलं आहे. फुप्फुसांमध्ये जमा होणाऱ्या कफाप्रमाणेच आयुर्वेदातील कफाची प्रवृत्ती चिकट असते. जर तुम्हाला हलकी थंडी वाजत असेल तर याचा अर्थ कफ असंतुलित झाला असू शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी काही सवयी सोडाव्या लागतील आणि काही कामे करावी लागतील.

या संकेतांकडे द्या लक्ष

- शरीराला जास्त थंडी वाजणे

- शरीरात जडपणा जाणवणे

- पाठ, हात, पाय किंवा डोक्यावर खाज

- शरीर चिकट किंवा ओलं राहणे आणि त्वचेवर लेपसारखा पदार्थ दिसणे

- शरीरात एखाद्या ठिकाणी जास्त वेदना किंवा पूर्ण शरीर दुखणे

- जास्तवेळ सुस्ती राहणे

शरीराचं नुकसान करतात या सवयी

- दिवसा झोपू नका

- जास्त गोड, थंड, पचनास जड, अ‍ॅसिड, चिकट, जास्त गंध असलेले पदार्थ खाऊ नका

- मासे, मांस, तीळ, मिठाई, दूध आणि दुधाचे पदार्थ खाऊ नका

- मिठाचं सेवन कमी करा

कफ कमी करण्याचे उपाय

रोज थोडा वेळ एक्सरसाईज करा

रोज अर्धा तास पायी चालावे

रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यावे

Web Title: High kapha dosha symptoms and signs and habits to avoid immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.