जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 02:31 PM2024-06-05T14:31:07+5:302024-06-05T14:31:57+5:30

Cancer Risk : रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती.

High risk of cancer in people after 40 age say study, know the reason | जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

जिभेचे चोचले पुरवण्यासाठी 'हे' पदार्थ खाणं करा बंद, रिसर्चमधून दावा कमी वयात होईल कॅन्सर

Cancer Risk : जर आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर जसजसं वय वाढत जातं तसतशा आरोग्यासंबंधी समस्याही वाढू लागतात. एका वयानंतर लाइफस्टाईलस, खाण्या-पिण्याकडे खास लक्ष द्यावं लागतं. जर असं केलं नाही तर महागातही पडू शकतं. तुम्ही जर ४० वयाचे असाल तर तुम्हीही तुमच्या खाण्याच्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला पाहिजे. नाही तर तुमहाला कॅन्सरचा धोका होऊ शकतो. असं आम्ही म्हणत नाही तर एका रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कॅन्सरच्या २० टक्के केसेस ४० वयाच्या पुरूष आणि महिलांमध्ये आढळतात. दिल्‍लीतील कॅन्सर मुक्‍त भारत फाउंडेशनमध्ये याचा खुलासा करण्यात आला आहे की, ४० पेक्षा कमी वयाच्या कॅन्सर रूग्णामध्ये ६० टक्के पुरूष तर ४० टक्के महिलांचा समावेश आहे. सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट आशीष गुप्‍ता यांनी सांगितलं की, यामागे खराब लाइफस्टाईल आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं अधिक सेवन हे कारण आहे.

हा रिसर्च भारतातील १३६८ कॅन्सर रूग्णांवर करण्यात आला. रिसर्चमधून समोर आलं की, देशात डोकं आणि मानेच्या कॅन्सरच्या केसेस आढळून येत आहेत. तर लिव्हर, पोट आणि कोलन कॅन्सरची संख्या १६ टक्के होती. ब्रेस्‍ट कॅन्सरच्या केसेस १५ टक्के तर ब्लड कॅन्सरच्या केसेस ९ टक्के समोर आल्या आहेत.

काय खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका

अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे ज्यात मीठ, साखर, आर्टिफिशियल कलर, फॅट आणि प्रिजर्वेटिव्स सारखे तत्व जास्त असतात. हे पदार्थ फॅट, स्‍टार्च आणि अतिरिक्‍त साखर टाकून बनवले जातात. फ्रोजन फूड, सॉफ्ट ड्रिंक, हॉट डॉग, पॅकेज्‍ड स्‍नॅक्‍स आणि फास्‍ट फूड अल्‍ट्राप्रोसेस्‍ड फूडमध्ये येतात. द लॅंसेटच्या रिपोर्टनुसार, अल्‍ट्राप्रोसेस्‍ड फूडचं जास्त सेवन कॅन्सरचं कारण बनत आहे.

कॅन्सर कसा टाळावा

तरूणांनी हेल्दी आणि फिट असल्यावरही नियमितपणे व्यायाम करावा. अल्ट्रा प्रोसेस्‍ड फूड खाणं बंद करावं आणि हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. तसेच तंबाखू आणि मद्यसेवन शक्य तेवढं कमी करा. ३० वयाचे झाल्यावर कॅन्सरची टेस्ट करा.

वेगवेगळे एक्सपर्ट वेळोवेळी हेच सांगत असतात की, लहान मुलांनी, तरूणांनी किंवा मोठ्यांनी कुणीही फास्ट फूडसारख्या वेगवेगळ्या पदार्थांच सेवन करू नये. कारण याने वजन वाढतं आणि लठ्ठपणाही वाढतो. लठ्ठपणा वाढला की, शरीर आपोआप वेगवेगळ्या आजारांचं घर ठरतं. हे आता लोकांनी ऐकलं पाहिजे. कारण याने जीवाला धोकाही होऊ शकतो.

Web Title: High risk of cancer in people after 40 age say study, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.