Cholesterol पेक्षाही घातक आहे Triglycerides, हृदयाच्या नसांना करतं ब्लॉक; जाणून घ्या उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 03:08 PM2022-08-25T15:08:57+5:302022-08-25T15:09:09+5:30
Triglycerides Causes : रक्तात ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. असं मानलं जातं की, जर रक्तात याचं प्रमाण वाढण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त लाइफस्टाईल आहे.
Triglycerides Causes : हृदयरोग आणि हार्ट अटॅकचं सर्वात मोठं कारण कोलेस्ट्रॉल मानलं जातं. हे तर सत्य आहे की, रक्तवाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने तुमचा ब्लड फ्लो प्रभावित होतो. याने हार्ट अटॅक आणि हार्ट स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. कोलेस्ट्रॉलप्रमाणेच शरीरात एक असा पदार्थ असतो ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. या पदार्थाला ट्रायग्लिसराइड्स (Triglycerides) असं म्हटलं जातं.
रक्तात ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढलं तर तुम्हाला हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. असं मानलं जातं की, जर रक्तात याचं प्रमाण वाढण्याचं कारण खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त लाइफस्टाईल आहे. याचा अर्थ हा झाला की, तुम्ही तुमच्या आहारात सुधारणा करून आणि एक अॅक्टिव लाइफस्टाईल अंगीकारून याचं प्रमाण कमी करू शकता.
काय आहे ट्रायग्लिसराइड्स?
मेयो क्लीनिकनुसार, ट्रायग्लिसराइड्स एकप्रकारचं फॅट आहे. जे रक्तात आढळून येतं. जेव्हा तुम्ही काही खाता तेव्हा शरीरात कोणत्याही कॅलरीला ट्रायग्लिसराइड्समध्ये बदलतं. ट्रायग्लिसराइड्स तुमच्या कोशिकांमध्ये जमा होतं. जर तुम्ही बर्न करण्यापेक्षा कॅलरीचं जास्त सेवन करत असाल तर ट्रायग्लिसराइड्स वाढतं. खासकरून कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांमुळे ते वेगाने वाढतं.
काय करू शकता उपाय?
आठवड्यातून किंवा रोज कमीत कमी 30 मिनिटे एक्सरसाइज करा. नियमित एक्सरसाइज केल्याने ट्रायग्लिसराइड्स कमी केलं जाऊ शकतं. याने गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही वाढेल. रोज पायऱ्या चढा किंवा ब्रेक दरम्यान चाला.
जास्त गोड खाऊ नये
शुगर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेटपासून दूर रहा. गोड पदार्थ जास्तीत जास्त टाळा. याने ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढू शकतं.
वजन कमी करा
या समस्येपासून दूर रहायचं असेल तर आधी तुम्हाला वजन कमी करावं लागेल. हे ध्यानात ठेवा की, एक्स्ट्रा कॅलरी ट्रायग्लिसराइड्समध्ये रूपांतरित होते. ते फॅटच्या रूपात जमा होतं. तुमच्या कॅलरी झाल्या तर ट्रायग्लिसराइड्स कमी होतं.
हेल्दी फॅटचं सेवन करा
आपल्या आहारात ऑलिव ऑइल आणि कॅनोला ऑइलचा समावेश करा. लाल मांसाऐवजी ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या मास्यांचं सेवन करा.
मद्यसेवन सोडा
मद्यसेवन पूर्णपणे बंद करा. कारण अल्कोहोलमध्ये कॅलरी आणि शुगर जास्त प्रमाणात असते. याने ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढतं.