'या' गोष्टीमुळे टाळता येतो त्वचेच्या कॅन्सरचा धोका, सोपा आणि साधा उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 10:39 AM2019-08-06T10:39:11+5:302019-08-06T10:49:54+5:30

अमेरिकेच्या ब्राउन यूनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, व्हिटॅमिन-ए १७ टक्क्यांपर्यंत त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

High vitamin A intake can lower skin cancer risk says researcher | 'या' गोष्टीमुळे टाळता येतो त्वचेच्या कॅन्सरचा धोका, सोपा आणि साधा उपाय!

'या' गोष्टीमुळे टाळता येतो त्वचेच्या कॅन्सरचा धोका, सोपा आणि साधा उपाय!

Next

वेगवेगळ्या कॅन्सरमधील त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर व्हिटॅमिन-ए युक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. अमेरिकेच्या ब्राउन यूनिव्हर्सिटीमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, व्हिटॅमिन-ए १७ टक्क्यांपर्यंत त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी होतो. अभ्यासकांनुसार, व्हिटॅमिन-ए त्वचा आणि शरीराच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावतं.

ब्राउन यूनिव्हर्सिटीचे असोसिएट प्रोफेसर यूनयांग चो यांच्यानुसार, त्वचेच्या कॅन्सरमध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचाही समावेश आहे, ज्याला रोखणं फार कठीण आहे. पण नुकत्या करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले आहे की, डाएटमध्ये व्हिटॅमिन-ए चा समावेश केला तर त्वचेच्या कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो. कारण व्हिटॅमिन ए चं सेवन केल्याने सूर्याच्या किरणांचा शरीरावर होणारा नकारात्मक प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

(Image Credit : Medical News Today)

अमेरिकन मेडिकल असोसिएशन डर्मेटोलॉजी यांच्यानुसार, हा रिसर्च खूप जास्त काळापासून सुरू होता. १९८४ ते २०१२ दरम्यान हा रिसर्च १, २१, ७०० महिलांवर करण्यात आला. त्यासोबतच १९८६ ते २०१२ दरम्यान ५१,५२९ अमेरिकन पुरूषांचाही या रिसर्चमध्ये समावेश करण्यात आला होता. यांच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ए युक्त फळं आणि भाज्यांचा समावेश करण्यात आला होता. रिसर्चमध्ये सहभागी महिला आणि पुरूषांची डाएट आणि त्वचेचा कॅन्सर यातील संबंध समजून घेण्यात आला.

(Image Credit : Best Life)

रिसर्चमध्ये १ लाख २३ हजार गोऱ्या लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यांच्या कुटूंबात कुणालाही कॅन्सर झालेला नव्हता. अशा गोऱ्या लोकांना त्वचेच्या कॅन्सरचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असतो. रिसर्चमध्ये सहभागी १, ९७८ लोकांमध्ये स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असल्याचे आढळून आले. हा त्वचेच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे. ज्यात कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढतात आणि त्यांना रोखणं कठीण असतं. शरीराची व्हिटॅमिन ए ची गरज भागवण्यासाठी डाएटमध्ये गाजर, शेंगदाणे, बदाम, ब्रोकली आणि चण्यांचा समावेश करावा.

Web Title: High vitamin A intake can lower skin cancer risk says researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.