त्रिपुरातील शेकडो विद्यार्थ्यांना HIV ची लागण; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 02:07 PM2024-07-10T14:07:13+5:302024-07-10T14:08:06+5:30

भारताच्या पूर्वेकडील त्रिपुरा राज्यातील 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

HIV vs AIDS : Hundreds of students in Tripura infected with HIV; Know how dangerous this disease is | त्रिपुरातील शेकडो विद्यार्थ्यांना HIV ची लागण; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार...

त्रिपुरातील शेकडो विद्यार्थ्यांना HIV ची लागण; जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार...

HIV vs AIDS : भारताच्या पूर्वेकडील त्रिपुरा राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS चा फैलाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्रिपुरा राज्य एड्स नियंत्र सोयायटीच्या(TSACS) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील 828 विद्यार्थ्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एचआयव्ही बाधित अनेक विद्यार्थी देशभरातील विविध विद्यापीठे किंवा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. 

एड्स (AIDS) हा एचआयव्ही (HIV) विषाणूमुळे होणारा आजार आहे. हे दोन्ही रोग एकच आहेत, असा बहुतांश लोकांचा समज आहे. पण, एड्स आणि एचआयव्हीमध्ये खूप फरक आहे. जाणून घेऊ या दोन्ही रोगांमधील अंतर...

HIV आणि AIDS मधील फरक 
एचआयव्हीला ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणतात, जो शरीराच्या WBC (पांढऱ्या रक्त पेशी) वर हल्ला करतो. यामुळे रोगप्रतिकार शक्ती इतकी कमकुवत होते की, शरीराला किरकोळ दुखापती किंवा आजारातूनही ठीक करता येत नाही. तर एड्स ही एक वैद्यकीय स्थिती आहे, जी एचआयव्हीमुळे होते. प्रत्येक एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीला एड्स होतोच असे नाही, परंतु एड्स फक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांनाच होतो.

एचआयव्ही पॉझिटिव्हला एड्स कधी होतो?
एड्स हा एचआयव्हीचा पुढचा टप्पा आहे. एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण झाली की, बरे होणे यापुढे शक्य नसते. परंतु, औषधांच्या मदतीने धोकादायक टप्प्यापर्यंत पोहोचणे टाळता येते. एचआयव्हीवर वेळेवर उपचार न केल्यास तो गंभीर स्टेज 3 पर्यंत पोहोचतो आणि मग एड्स होतो. असे बरेच लोक आहेत, जे एचआयव्ही पॉझिटिव्ह असूनही, त्यांना एड्स नाही.

एचआयव्ही संसर्गाची लक्षणे
1. दोन ते चार आठवड्यांत लक्षणे दिसू लागतात.
2. ताप, डोकेदुखी, पुरळ किंवा घसा खवखवणे यासारख्या सुरुवातीच्या समस्या
3. वजन कमी होणे, अतिसार, खोकला, लिम्फ नोड्स सुजणे

एड्स किती धोकादायक आहे?
डब्ल्यूएचओच्या मते, एड्स हा आजार नाही, परंतु जेव्हा तो होतो, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती इतकी कमकुवत होते की, शरीर सहजपणे रोगांना बळी पडते आणि त्यातून बरे होणे अशक्य होते. एड्स हा एचआयव्ही विषाणूमुळे होतो, जो असुरक्षित लैंगिक संबंधातून, संक्रमित व्यक्तीच्या रक्ताद्वारे किंवा गर्भधारणेदरम्यान किंवा संक्रमित मातेकडून प्रसूतीदरम्यान तिच्या बाळामध्ये पसरू शकतो.

एचआयव्हीवरील उपचार आणि प्रतिबंध
एचआयव्ही विषाणूवर अद्याप कोणताही इलाज नाही, पण अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत ते टाळण्यासाठी इंजेक्शनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. यावर अजूनही काम सुरू आहे. काही औषधांच्या मदतीने एचआयव्हीवर नियंत्रण ठेवता येते आणि धोकादायक अवस्थेत जाण्यापासून रोखता येते. एचआयव्हीवरील औषधांना अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) म्हणतात. एचआयव्ही टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवताना काळजी घेणे आवश्यक आहे. रोगाची लक्षणे तात्काळ डॉक्टरांना दाखवावे.

Web Title: HIV vs AIDS : Hundreds of students in Tripura infected with HIV; Know how dangerous this disease is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.