Hives causes symptoms : उन्हाळ्यात 'या' ८ गोष्टींमुळे तुमच्याही शरीरावर येऊ शकतं पित्तं; जाणून घ्या लक्षणांसह बचावाचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 11:46 AM2021-04-02T11:46:13+5:302021-04-02T11:51:16+5:30

Hives causes symptoms : मान, बोटं, चेहरा  या भागांवर हे पित्त झालेलं दिसून येतं. हे पित्त ६ आठवड्यांपेक्षा जास्तवेळ त्वचेवर राहू शकतं. 

Hives causes symptoms treatment and prevention of pitt | Hives causes symptoms : उन्हाळ्यात 'या' ८ गोष्टींमुळे तुमच्याही शरीरावर येऊ शकतं पित्तं; जाणून घ्या लक्षणांसह बचावाचे उपाय

Hives causes symptoms : उन्हाळ्यात 'या' ८ गोष्टींमुळे तुमच्याही शरीरावर येऊ शकतं पित्तं; जाणून घ्या लक्षणांसह बचावाचे उपाय

googlenewsNext

जेव्हा शरीरात अनेक कारणांमुळे एलर्जीक रिएक्शन होते तेव्हा पित्तं उसळलं असावं असं आपण म्हणतो. उन्हाळ्याच्या दिवसात अपचन, एसिडीटी यांसारख्या समस्या वाढल्यानं पित्त होण्याची शक्यता जास्त असते. यावेळी शरीरावर लाल रंगाचे दाणे येतात,  तर कधी खाज येते,  तापमानात होत असलेल्या बदलांमुळे ही समस्या वाढत जाते.  आज आम्ही तुम्हाला  पित्ताचे किती प्रकार असतात, पित्त का उद्भवतं, लक्षणं आणि यापासून वाचण्यासाठी कोणते उपाय करता येतील याबाबत सांगणार आहोत. 

पित्त होण्याची कारणं

ताण तणाव

चुकीच्या औषधांचे सेवन

सुर्याच्या किरणांशी थेट संपर्क आल्यास

त्वचेवर दबाव पडल्यामुळे 

रासायनिक पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे

प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे

शरीरावर कोणत्याही प्रकारची एलर्जी

पित्ताचे प्रकार

पित्ताचे प्रकार दोन असतात. एक म्हणजे एक्यूट आणि क्रॉनिक यामुळे दीर्घकालीन पित्ताचा त्रास सहन करावा लागू शकतो. एक्यूट पित्त ६ आठवडे किंवा त्यापेक्षा कमी वेळ राहू शकते. मान, बोटं, चेहरा  या भागांवर हे पित्त झालेलं दिसून येतं. हे पित्त ६ आठवड्यांपेक्षा जास्तवेळ त्वचेवर राहू शकतं. 

लक्षणं

पित्ताचा आकार बदलत राहणे

हाता पायांना सुज येणं

गुलाबी, लाल रंगाच्या पुळ्या शरीरावर येणं

तीव्रतेनं खाज येणं

डोके दुखी

घसा, ओठ्यांमध्ये सूज येणं

श्वास घ्यायला त्रास होणं

चक्कर येणं

उलटी, मळमळ होणं. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

पित्तापासून बचावाचे उपाय

१) बाहेर जाताना सुती कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. उन्हात जाताना सनग्लासेस लावा

२) जास्त थंडीच्या संपर्कात आल्यानंतरही पित्ताची समस्या उद्भवते. अशा स्थितीत थंड वातावरणात जाणं टाळा

३) कोणत्या चुकीच्या औषधाचं सेवन केल्यानं शरीरावर पित्ताची समस्या उद्भवू शकते.  त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

४) जास्त गरम पाण्यानं अंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्यानं अंघोळ करा. 

५) जास्त जळजळ वाटत असेल तर थंड पाण्यानं शेकून घ्या. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

(टिप- वरिल सर्व माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत  पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरेल. )
 

Web Title: Hives causes symptoms treatment and prevention of pitt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.