फोन नीट धरा, अन्यथा करंगळी होईल वाकडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 07:00 AM2024-08-20T07:00:52+5:302024-08-20T07:01:18+5:30
तरुणांमध्ये हातापासून मेंदूशी संबंधित नसांवरही परिणाम
नवी दिल्ली: तुम्ही मोबाइल करंगळीने म्हणजेच हाताच्या सर्वांत लहान बोटावर धरत असाल तर काळजी घ्या. तुम्ही पिंकी, कार्पल टनल आणि क्युबाइटल टनल सिंड्रोमचे बळी ठरू शकता. यामुळे, बोटांची आणि हातांची रचना विकृत होऊ शकते. याने मेंदूशी संबंधित नसांवरही परिणाम होऊ शकतो. जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मोबाईलची सवय अनेकांना लागली असून, याचा नकारात्मक परिणाम प्रत्येकाच्या शरीरावर होताना दिसत असल्याचे आतापर्यंतच्या अनेक अहवालांतून समोर आले आहे.
केस १: हात सुन्न पडतो
कंपनीत काम करणारा तरुण (२५) सर्व कामे फोनद्वारे करतो. करंगळीवर फोन धरण्याची त्याला सवय झाली. त्यामुळे हात सुन्न पडायला सुरुवात झाली. मानेपासून पाठीपर्यंत वेदना सुरू झाल्या.
केस २: करंगळीवर पडला खड्डा
१८ वर्षीय तरुणी करंगळीवर फोन ठेवून फोन वापरतो. यामुळे बोटांचे स्नायू कमकुवत झाले. करंगळीत वेदना होत होत्या. सतत करंगळीवर फोन पकडल्याने करंगळीवर खड्डा पडला.
काय होते?
प्रथम करंगळी वाकडी होण्यास सुरुवात होते. दुसरा टप्पा कार्पल टनल सिंड्रोम असतो. यात तळहात आणि मनगटावर वेदना निर्माण होतात. तिसरा टप्पा क्यूबाइटल सिंड्रोम धोकादायक आहे. यामध्ये बोटांवर ताण आल्याने हाताच्या संरचनेवर परिणाम होऊन स्नायू व मज्जातंतूंवर परिणाम होतो.
मोबाइलचे वजन किती?
सामान्य वजन ११३ ते १९८ ग्रॅम, सरासरी वजन १९९ ते ३०० ग्रॅम, अधिक वजन ३०१ ग्रॅमपेक्षा, कव्हरचे वजन ५० ते २५० ग्रॅम
मोबाइल करंगळीने जास्त वेळ धरून ठेवल्याने पिंकी, कार्पल टनल आणि क्यूबाइटल टनल सिंड्रोम होतो. वेदना कोपरपासून मानेपर्यंत पसरते. न्यूरोलॉजिकल आजाराचा धोकादेखील असतो.
- डॉ. अजय फौजदार, फिजिओथेरपिस्ट