लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, जाणून घ्या किती वेळा लघवीला जाणं गरजेचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 10:20 AM2020-02-28T10:20:11+5:302020-02-28T10:28:52+5:30
युरिनरी ब्लॅडरवर परिणाम होऊन लघवी लागण्याची समस्या सर्वाधिक उद्भवू शकते.
अनेकदा तुम्ही पब्लिक प्लेसवर किंवा एखाद्या मिटींगमध्ये बसलेले असता तेव्हा त्याठिकाणी वॉशरूमची सुविधा नसेल तर तुम्हाला लघवी थांबवून ठेवावी लागते. अशावेळी पोट फुगून दुखलायला सुरूवात होते. अनेकांना तर लघवी रोखून ठेवण्याची सवय सुद्धा झालेली असते. सतत लघवीला जाण्याची सवय सुद्धा योग्य नाही. पण बराच वेळ लघवी रोखून धरल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लघवी थांबण्याची कारणं काय आहेत जाणून घ्या.
शरीराचं तापमान वाढणं
खूप गरम किंवा खूप थंडी वाटणं
उलटीसारखं होणं
वारंवार लघवीला जावं लागणं
रात्रीसुद्धा लघवीला जाणं
लघवीला दुर्गंधी येणं
लघवीचा रंग फिकट किंवा हलका लाल होणे.
लघवी रोखण्याचे दुष्परीणाम
एक चागलं आणि निरोगी ब्लॅडर साधारणपणे ४०० ते ५०० मिलीलिटर युरिन थांबवून ठेवू शकतं. कधी कधी लघवी थांबवण ठिक आहे. पण हे सतत होत राहील्यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील मासपेशी कमजोर होत असतात.
साधारणपणे महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवत असते. कारण त्यांना लघवी कंट्रोल करणं अवघड जात असतं. सतत लघवी रोखल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. त्यामुळे लघवी रोखल्यामुळे युरीन लीक होत असतं. युरिनरी ब्लॅडरवर परिणाम होऊन लघवी लागण्याची समस्या सर्वाधिक उद्भवू शकते.
यूटीआय ही महिलांमध्ये सर्वाधिक जाणत असेलेली समस्या आहे. यात लघवीच्या अवयवांमध्ये इन्फेक्शन होत असतं लघवी थांबवल्यामुळे हा आजार होऊ शकतो. जर तुम्हाल सतत ही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. युटीआई तेव्हा होतं जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पचन तंत्रातून निघून किंवा इतर माध्यमातून लघवीच्या मार्गावर चिकटतात आणि वेगाने वाढत जातात. जर या इन्फेक्शनकडे वेळीच लक्ष न दिल्यास बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडर आणि किडनीपर्यंत पोहचू शकतात आणि तुम्हाला इजा होऊ शकते. ( हे पण वाचा-शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रिकाम्यापोटी 'असं' करा दह्याचं सेवन....)
ब्लॅडर स्ट्रेचिंग
जेव्हा तुम्ही तुम्ही नियमीतपणे मुत्राशयाकडून लघवी रोखत असता त्यावेळी स्ट्रेचिंगची समस्या उद्भवू शकते. पोटात जास्त दुखू शकतं. अनेकदा तुमच्या या सवयीमुळे किडनी स्टोन सुद्धा होऊ शकतो. तसंच वारंवार लघवी केल्यामुळे पेल्व्हीकच्या स्नायूंचं नुकसान होतं. पेल्व्हिक फ्लोर एक्सरसाईज केल्याने स्नायूंना मजबूती मिळते आणि लघवीला होणारा त्रासही थांबतो. ( हे पण वाचा-जीवघेण्या आजारांपासून बचाव करणाऱ्या गुळवेलाचे फायदे वाचाल तर गोळ्या घेणं कायमचं विसराल!)