शिंक रोखणं ठरू शकतं घातक, एका व्यक्तीची श्वासनलिका फाटली; करू नका ही चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 10:02 AM2023-12-16T10:02:53+5:302023-12-16T10:03:15+5:30

Holding sneeze dangerous : बरेच लोक शिंक रोखण्याचा प्रयत्न करतात. पण शिंक रोखल्यामुळे काय होऊ शकतं हे दाखवणारी एक घटना नुकतीच घडली.

Holding sneeze is dangerous man ruptures windpipe while holding his nose | शिंक रोखणं ठरू शकतं घातक, एका व्यक्तीची श्वासनलिका फाटली; करू नका ही चूक

शिंक रोखणं ठरू शकतं घातक, एका व्यक्तीची श्वासनलिका फाटली; करू नका ही चूक

Holding sneeze dangerous : शिंकणे ही एक सामान्य बाब आहे. सर्दी झाल्यावर शिंका येऊ शकतात. तर कधी कधी सामान्य स्थितीतही शिंका येतात. काही लोकांना तर नेहमीच शिंका येतात. ज्यामुळे ते वैतागलेले असतात. अनेकदा काही लोक शिंक रोखतात. पण बालपणापासून आपल्याला सांगितलं जातं की, शिंक रोखल्याने मेंदूची नस फाटते तर काहींचे डोळे बाहेर निघतात.

बरेच लोक शिंक रोखण्याचा प्रयत्न करतात. पण शिंक रोखल्यामुळे काय होऊ शकतं हे दाखवणारी एक घटना नुकतीच घडली. बीएमजे केस स्टडीनुसार, एका व्यक्ती शिंक रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची श्वासनलिका फाटली.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ही व्यक्ती कार चालवत होती. तेव्हा त्याला ताप आला. जेव्हा त्याला शिंका येणं सुरू झालं तेव्हा त्यांने शिंका रोखल्या. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, त्याला अचानक शिंक आली, पण त्याने ती नाक आणि तोंड दाबून रोखली. शिंकेचा दबाव इतका जास्त होता की, त्याच्या श्वासनलिकेत 0.08 इंच बाय 0.08 इंचाचं छिद्र पडलं.

असं का झालं?

शिंक येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. शिंकांना खोकला आणि सर्दीचं एक संक्रामक लक्षणही मानन्यात आलं आहे. जेव्हा तुम्ही शिंक रोखता तेव्हा तयार होणारा दबाव शिंकल्यानंतर निर्माण झालेल्या दबावापेक्षा 20 पटीने जास्त असतो.

फाटल्या होत्या मांसपेशी

व्यक्तीचा लगेच एक्स-रे काढण्यात आला. घशाच्या एक्स-रे तून समजलं की, शिंकण्यामुळे हवा त्वचेच्या सगळ्यात खोल टिश्यूच्या खाली अडकली होती. त्याची कंप्यूटेड टोमोग्राफी आणि सीटी स्कॅन करण्यात आला. तेव्हा समजलं की, त्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या हाडाच्या मधे मांसपेशी फाटली आहे. त्याच्या छातीत फुप्फुसांमध्ये हवा जमा झाली होती.

रिपोर्ट्सनुसार, त्याला फार वेदना होत होत्या. मान दोन्ही बाजूने सूजली होती. हालचाल करण्यात त्याला समस्या होत होती. डॉक्टरांनी चेक केल्यावर त्याना खटखट असा आवाज ऐकू आला. असं असूनही व्यक्तीला श्वास घेण्यास, गिळण्यास आणि बोलण्यास  काही समस्या होत नव्हती. पण त्याचा त्याच्या गळ्याच्या गतीवर कंट्रोल राहिली नव्हता. त्याच्यावर पेनकिलर उपचार करण्यात आला. त्याला पूर्णपणे बरा होण्यासाठी 5 दिवस लागले.

Web Title: Holding sneeze is dangerous man ruptures windpipe while holding his nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.