अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 03:51 PM2024-08-28T15:51:48+5:302024-08-28T16:12:36+5:30

Holding tears : अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. ते कसं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Holding tears bad for mental and physical health | अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान!

अश्रू जबरदस्तीने रोखणं पडू शकतं महागात, होऊ शकतं गंभीर नुकसान!

Holding tears : वेगवेगळ्या भावना जेव्हा व्यक्तीकडून व्यक्ती होतात तेव्हा अनेकदा डोळ्यातून अश्रू येतात. डोळ्यांमधून अश्रू येणं ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. काही लोकांच्या डोळ्यातून खूप अश्रू येतात तर काही लोकांना अजिबातच रडू येत नाही. तर काही लोक डोळ्यातील अश्रू रडताना रोखून धरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. ते कसं हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अश्रू रोखण्याचे नुकसान

जेव्हा आपण अश्रू रोखून ठेवतो, त्यांना वाट मोकळी करून देत नाही तेव्हा आपलं शरीर मानसिक आणि शारीरिक तणावात येतं. अश्रू निघाल्याने शरीराला आराम मिळतो आणि भावनांचं संतुलन कायम राहतं. पण जर अश्रू जबरदस्तीने रोखले तर यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. ज्यामुळे डिप्रेशन किंवा चिंता अशा गंभीर समस्या होऊ शकतात.

होऊ शकतो गंभीर आजार

अश्रू रोखल्याने केवळ मानसिक आरोग्यावर प्रभाव पडतो असं नाही तर शारीरिक आरोग्याचं देखील नुकसान होतं. काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, अश्रू जबरदस्तीने रोखल्याने हृदयरोग, हाय ब्लड प्रेशर आणि इतरही गंभीर समस्या होऊ शकतात.

अश्रू येऊ देणं गरजेचं

जर तुमची रडायची ईच्छा असेल तर अश्रू येऊ द्या. याने तुमचं मानसिक आणि सोबतच शारीरिक आरोग्यही चांगलं राहील. अश्रू ढाळल्याने भावनात्मक तणाव कमी होतो, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तुमचं मन हलकं होतं. 

रडणं म्हणजे कमजोर असणं नाही

रडले म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही, उलट ही एक नॅचरल प्रोसेस आहे जे आपल्या भावनांना मार्ग मोकळा करण्याचं माध्यम आहे. जेव्हा आपण रडतो तेव्हा आपलं शरीर तणाव आणि भावनात्मक ओझ्यातून मुक्त होतं. रडणं हे दाखवतं की, आपण मनुष्य आहोत. ज्यांना भावना आहेत आणि त्या जिवंत आहेत. रडल्याने आपण शारीरिक आणि मानसिक दृष्टीने मजबूत होतो. कारण याने तणाव कमी होतो आणि मन हलकं होतं. त्यामुळे रडण्यासाठी लाजू नका किंवा कुणी काय म्हणेल याचा विचार करू नका. 

Web Title: Holding tears bad for mental and physical health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.