आत्ताच घरबसल्या 'हे' व्यायाम कराल तर लॉकडाऊनसंपेपर्यंत स्लिम, फिट दिसाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 04:21 PM2020-04-10T16:21:33+5:302020-04-10T16:25:25+5:30
घरी असाताना स्वतःसाठी १० ते २० मिनीट काढून तुम्ही हा व्यायाम करू शकता.
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी वजन वाढण्याची समस्या महिलांसह पुरूषांना सुद्धा जाणवणार. शरीराची योग्य ती हालचाल झाली नाही तर कमरेचा, पोटाचा, मांड्यांचा घेर वाढत जातो. त्यामुळे कपडे घट्ट तर होतात. पण सगळ्यात जास्त मानसिक ताण येतो.
आज आम्ही तुम्हाला काही खास सोपे व्यायामप्रकार सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही स्वतःला मेटेंन ठेवू शकता. घरी असाताना स्वतःसाठी १० ते २० मिनीट काढून तुम्ही हा व्यायाम करू शकता. त्यासाठी फारशी जागा पण लागणार नाही.
बिअर क्रॉल्स वर्कआउट :
(image credit- giphy)
पायात अंतर घेऊन पुशअप्सच्या पोझिशनपासून सुरुवात करा. त्यानंतर डावा पाय आणि उजवा हात पुढे आणत एक स्टेप पुढे जा. आता उजवा पाय आणि डाव्या हाताने पुढची स्टेप घ्या.
जंपींग जॅक
(image credit- Gfycat)
दोन्ही हात सरळ रेषेत शरीराला टेकवून उभे राहा. दोन्ही पाय शरीरापासून आडव्या दिशेत बाहेर घ्या आणि याच वेळी हात खांद्याच्या रेषेत आडवे वर करा. पुन्हा उडी मारून पूर्वस्थितीत या. असं किमान २० वेळा जम्पिंग करा. जंपिंग जॅक केल्यामुळे तुम्हाला शरीर हलसं झाल्यासारखं वाटेल पण सातत्याने हा व्यायाम प्रकार केल्यास वजन कमी होईल.
इंच वर्म
(image credit- Giphy)
यासाठी आधी सरळ उभं राहत ओणवं होऊन हाताच्या बोटांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू शरीराच्या वरचा भाग जमिनीच्या दिशेने आणा आणि हात पुढे करा. एकदा पुशअप पोझिशनप्रमाणे आल्यावर दोन्ही पाय छोटी स्टेप घेत हाताजवळ आणा. ही क्रिया रिपीट करा.
माउंटन क्लाइम्बर्स
(image credit- MSN.com)
हा व्यायाम प्रकार करण्यासाठी पुशअप्सच्या पोझिशनपासून सुरुवात करत तुमचा एक पाय हाताजवळ आणा आणि परत तो होता त्या स्थितीत ठेवा. हा प्रकार पुन्हा दुसऱ्या पायासोबतही करा. हा प्रकार शक्य तितक्या वेगात करण्याचा प्रयत्न करा. मांड्याची आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायामप्रकार फायदेशीर ठरतील.
लंजेस
(image credit- pintrest)
सरळ उभं राहून हात कमरेवर ठेवा किंवा सरळ रेषेत शरीराला खेटून ठेवा. प्रथम डावा पाय गुडघ्यात वाकवून पुढे न्या. गुडघा पायाच्या अंगठय़ाच्या रेषेपेक्षा पुढे गेला पाहिजे. मागचा पाय गुडघ्यात थोडा वाकवून बॅलन्स करा. पूर्वस्थितीत या आणि आता हीच क्रिया दुसरा पाय पुढे वाकवून करा. गुडघ्यात वाकताना शरीराचा वरचा भाग झुकवू नका. पाठ ताठ राहील. यामुळे शरीर लवचीक होऊन स्नायू बळकट होतात.